पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती राजवट लागू करावी

बंगालमधील हिंसाचाराच्या विरोधात उदगीर भारतीय जनता पार्टीने दिले निवेदन

उदगीर प्रतिनिधी

 पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्यानंतरही नंदिग्राम मध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्यामुळे नाराज असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर हल्ले होत आहेत, आराम बाग येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालय जळीत  प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे चार कार्यकर्ते मृत्युमुखी पडले, प्रचंड हिंसाचार भाजपा कार्यकर्त्यांवर होत असून या परिस्थितीमध्ये पश्चिम बंगाल मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी उदगीर भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आली. यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे,भाजप नेते धर्मपाल नादरगे, उपनगराध्यक्ष सुधीरभाऊ भोसले,  उदगीर भाजपा शहराध्यक्ष उदय सिंग ठाकूर,प्रेदेश सदस्य उत्तरा कलबुगे,जिल्हा सरचिटणीस श्यामला कारामुगे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मजगे, नगरसेवक गणेश गायकवाड,शहर सरचिटणीस पप्पू गायकवाड, शहर सरचिटणीस नागेश आस्तुरे,आनंद बुंदे, सभापती मनोज पुदाले,ऍड दत्ता पाटील,रामेश्वर पवार,शेरीकर,वसंत शिरसे,लाखन कांबळे, बाळासाहेब पाटोदे,संजय शाहीर,भोसले सर,इरशा द शेख,अमित धुमाळ इत्यादी उपस्थित होते

Popular posts
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image
प्रभाग क्र . 20 मधून राजू भोसले यांनी काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज मतदारांमध्ये जोरदार चर्चा
उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू — महायुतीमध्ये उमेदवारीवरून नाराजगी सूर
Image
तोगरी पंचायत समितीसाठी अंकुश ताटपल्ले पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
Image
तिवटग्याळ ग्रामविकासात सरपंच प्रशांत पाटील यांचे उल्लेखनीय योगदान – ‘आदर्श सरपंच’ पुरस्कारासाठी योग्य दावेदार
Image