रुग्णासह इतर आजारी रुग्णांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घ्यावी -जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे.आरोग्य सेवेत हयगय करणारांची गय केली जाणार नाही. जिल्ह्यातील सर्व THO ना आरोग्य सेवा देण्याची केली सूचना .
लातूर प्रतिनीधी--- जिल्हयातील आरोग्य अधिकार्यांनी,आरोग्य कर्मचार्यांनी कोरोनाच्या महामारीपासून जनतेचे संरक्षण करण्यासाठी आरोग्य यंञणा सज्ज ठेवत कोरोना सह इतर आजारी रुग्णांची गैरसोय होऊ नये आसे आदेश जिल्हापरिषद अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी आरोग्य अधिकार्यांच्या बैठकीत आरोग्य अधिकारी व कर्मचार्यांना दिल्याने कोरोनापासून जनतेचे संरक्षण करण्यासाठी जिल्हापरिषद अध्यक्ष चांगलेच अॅक्शन मोडमध्ये आल्याचे आज पाहायला मिळाले. लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची बैठक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षांनी जिल्हातील सर्वच आरोग्य अधिकार्यांची व कर्मचार्यांची बैठक आयोजीत केली होती या बैठकीत आरोग्य अधिकार्यांना सतर्क राहाण्याचे आदेश देत आरोग्ययंञणा सतर्क केली आहे.जिल्हयात आरोग्य यंञणेमार्फत सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्र येथे लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून लवकरच गाव पातळीवर ही लसीकरणासाठी आरोग्य विभागाने सज्ज राहावे असे निर्देश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिले.
या बैठकीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये असलेल्या कोरोना रुग्णांची आढावा बैठक घेण्यात आली. लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 67839 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 52451 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण मृत्यू 1186 झाले आहेत.जिल्ह्याचा मृत्यू दर हा 1.75 इतका आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर हा 77.32 इतका मोठा आहे.लातूर जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण 422357 तपासण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 67839 रुग्ण हे पॉजिटीव्ह आले आहेत. रुग्ण पॉजिटीव्ह येण्याचा दर 16.06 % आहे. आरोग्य विभागातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर, उपकेंद्र स्तर व गाव पातळीवर लसीकरण मोहीम अतिशय चांगल्या पद्धतीने राबविण्यात येत आहे, त्याबद्दल जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सत्कार केला. जिल्हा परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या लातूर मधील 12 नंबर पाटी येथील कोविड डेडिकेटेड हॉस्पिटलला जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली होती. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे अतिशय दर्जेदार सुविधा रुग्णांना पुरविण्यात येत आहेत. लसीकरणाची गती आणखीन वाढवावी असे निर्देश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिले. आरोग्य विभागाच्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई साळुंके , मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे, समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.