न भुतो न भविष्यती अशा दोन कोटी रू. जमा करण्याच्या अभिमानास्पद निर्णयाबद्दल जि.प #अध्यक्ष व कर्मचारी बांधवांचे मनःपुर्वक आभार, तुमची ऐतीहासीक मदत जिल्हा वासीय कधीच विसरणार नाहीत.
अध्यक्षांनी साद घालावी आणी त्याला पुरेपुर अशी साथ कर्मचारी वर्गांनी द्यावी अस क्वचीतच, पन लातुर जि.प.अध्यक्ष राहुलभैय्या केंद्रे यांनी कोवीड काळात मदतीसाठी हाक दिली आणी सर्व कर्मचारी बांधवांनी आपल्या एक दिवसाचा पगार तब्बल दोन_कोटी रूपये जमा करण्याचा संकल्प केला*.
कोव्हिड-19 च्या आपत्कालीन परिस्थिती जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी मदतीसाठी सरसावले - जमा करणार 2 कोटी रू
जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या आवाहनाला जि.प. अधिकारी व कर्मचा-यांचा सकारात्मक प्रतिसाद
लातूर :- (प्रतिनिधी) सद्यस्थितीत कोरोनाच्या दुस-या लाटेने लातूर जिल्हा प्रभावित झाला असून हा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे दररोज 1500 ते 2000 रुग्ण कोरोना बाधित होत असताना,या सर्व बाधित रुग्णांना आरोग्याशी संबंधित सोयीसुविधा उपलब्ध करून देताना प्रशासकीय यंत्रणा अक्षरशः हतबल झाले असून, रुग्णांनाऑक्सिजन,व्हेंटिलेटर, बेड याची प्रचंड मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत आहे. तेव्हा सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी व शिक्षक संघटनेने मदतीसाठी पुढे यावे असे आवहान लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले होते , या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी संघटना व शिक्षक संघटनेची एक बैठक घेण्यात आली या बैठकीत जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी संघटना तसेच शिक्षक संघटनेने एक दिवसाचे वेतन या आपत्कालीन परिस्थितीत मदत म्हणुन निधी संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात जिल्हा परिषद वर्ग 1 ते वर्ग 4 कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन जवळपास 2 कोटी रूपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आली. या जमलेल्या निधीतून कोरोना बाधित रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, कोरोना प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना करणे, तसेच जिल्हा परिषद अंतर्गत बाधित कर्मचा-यांवर वैद्यकिय उपचार करणे, तसेच या रोगाच्या प्रादुर्भावाने दुर्दैवाने मृत झालेल्या जि.प.कर्मचा-यांच्या कुंटूबियास मदत करणे या कामी हा निधी वापरण्यात येणार आहे यापुर्वीही लातूर जि.प. कर्मचा-यानी आत्महत्याग्रस्त शेतकरी मदतीसाठी व कुपोषणग्रस्तासाठीही 1 दिवसाचे वेतन मदत म्हणून देऊ केलेली आहे
काल झालेल्या या बैठकीला जि.प.अधिकारी, कर्मचारी व शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.*