पोलिस बांबूच्या ओल्या पार्टीला वरिष्ठांचे अभय !

 उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याती पोलिसांचा अजब कारभार समोर आला असुन लॉकडाऊनचे नियम मोडत तीन पोलिसांची दारू- मटणाची पार्टी एका हॉटेलात केली. ज्यांच्या हातात कायदा सुव्यवस्था आहे. तीच मंडळी नियम धाब्यावर बसवून मनमानी करीत असतील तर त्यांच्यावरही कार्यवाही झाली पाहिजे, याप्रकरणाकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देवुन योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा सर्वसामान्य जनतेचा पोलिस खात्यावरचा विश्वास उडेल.

     उदगीर शहरालगत असलेल्या नांदेड- बिदर रोड वरिल हॉटेल वाडा लंच होम येथे बेकायदेशीर एकत्र जमुन आठ ते दहा जन दारू पित होते. विशेष म्हणजे यात तीन जन उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशनच्या गुन्हे शाखेती कर्मचारी नामदेव सारोळे, दयाराम सुर्यवंशी व कलमे यांचा समावेश होते. एका बाजूला कोरोनाची महामारी झपाट्याने पसरत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यसरकारने लॉकडाऊन जाहिर केले आहे. याकाळात सर्व काही बंद असुन फक्त सकाळी ७ ते ११ या वेळेत जिवन अवश्यक वस्तुची दुकाने उघडण्याची मान्यता देण्यात आली आहे. बार- दारू दुकाने पुर्णपणे बंद आहेत. अशा गंभीर काळात पोलिस कर्मचारी दारूची सोय करतात अन् हॉटेल लंच होम येथे मस्त पार्टी करतात. 

    ग्रामीण पोलिस स्टेशनचे हे तीन पोलिस कर्मचारी आपल्या काही मित्रांना घेवुन भर दुपारी दारू पार्टी करीत असल्याची चर्चा जोरात सुरु असताना पोलिस निरीक्षक दिलीप वाघमारे, उपविभागीय पोलीस अधीक्षक व वरिष्ठ पोलिस अधिकारी कसलीच कार्यवाही करीत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी वेगळा कायदा अन् सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगळा कायदा आहे की काय ? शंका व्यक्त केली जात आहे.

Popular posts
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image
प्रभाग क्र . 20 मधून राजू भोसले यांनी काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज मतदारांमध्ये जोरदार चर्चा
उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू — महायुतीमध्ये उमेदवारीवरून नाराजगी सूर
Image
तोगरी पंचायत समितीसाठी अंकुश ताटपल्ले पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
Image
उदगीरात वेश्या व्यवसायवर ग्रामीण पोलिसाची कार्यवाही
Image