अतिवृष्टी ओला दुष्काळ घोषित करावे व सुशिक्षित बेरोजगारांना मासिक भत्ता देण्याची मागणी
देवणी / प्रतिनिधी
देवणी तालुक्यात सप्टेंबर 2020 मध्ये तिन्ही मंडळांमध्ये सतत अठरा दिवस पावसाची अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी बाधित नैसर्गिक आपत्ती कायद्यानुसार शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य मिळावे. सुशिक्षित बेरोजगारांना मासिक भत्ता मिळावा. चालू पिक कर्ज खातेदाराच्या खात्यात रक्कम जमा करावी अशी मागणी लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण माजी अशासकीय सदस्य श्री पांडुरंग रामराव कदम व सहकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे तहसीलदार देवणी यांच्याकडे केली आहे
थोडक्यात सविस्तर वृत्त असे की देवणी तालुक्यात तीन मंडळ विभागात शासकीय पर्जन्यमान नोंदवही च्या टक्केवारीनुसार सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये सतत अठरा दिवस कमीत कमी 74. टक्के व जास्तीत जास्त 118 टक्के अति पाऊस पडल्याची नोंदी प्रमाणे शासकीय निकष नुसार एका दिवसात सतत पाऊस.70. टक्के पेक्षा जास्त असल्यास. अतिवृष्टीबाधित क्षेत्र घोषित करता येते. सतत 18 दिवस अतिवृष्टी 100 टक्के पेक्षा जास्त झाल्यामुळे. केंद्र शासनाने लागू केलेल्या नेसर्गिक आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वानुसार जानेवारी 2014 मध्ये राज्य शासन परिपत्रक नमूद केल्याप्रमाणे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नुकसानीची टक्केवारी पाहता सरासरी प्रति हेक्टरी 12 हजार रुपये अर्थसाह्य देण्याची तरतूद असून वाढवून प्रति हेक्टरी 24 हजार रुपये अर्थसाह्य द्यावे .नदी कडेला शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान झाले असल्यास जिरायत बागायत पिकानुसार प्रतिहेक्टरी अर्थसाह्य देण्याची तरतूद असून परिपत्रकाची अंमलबजावणी करावी राजकीय पुढार्यांचे स्टंटबाजी पंचनामे जाहिरात बाजी भरपूर झाले. त्वरित मदत द्यावी .तसेच 7 ऑक्टोंबर 2019 मध्ये विधानसभा निवडणूक पूर्व महा आघाडीने सुशिक्षित बेरोजगारांना मासिक पाच हजार रुपये भत्ता देण्याचा कायदा करून जाहीरनामा द्वारे आश्वासन दिले होते. व पदवीधर बेरोजगारांना वार्षिक शंभर दिवसाची रोजगार देण्याची आश्वासनाची पूर्तता करावी. असे निवेदनात नमूद करून महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना चालू खातेदारांना प्रोत्साहनपर जाहीर केलेली रक्कम rs.50000. रुपये कर्ज खात्यात जमा करून अतिवृष्टी धारक शेतकऱ्यांना संकटकालीन मदत होईल . अशी मागणी तहसीलदार देवणी मार्फत. मुख्यमंत्री. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री. जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे निवेदनाद्वारे शेतकरी प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कदम. रितेश सुर्यवंशी. धनराज नरवटे. अलिमुद्दिन शेख. सोहेल शेख. बाबुराव कंटे. बालाजी बंडगर आधीच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.