विद्या वर्धिनीत हास्कूल येथे वाचन प्रेरणा दिन साजरा
उदगीर प्रतिनिधी
उदगीर येथील विद्या वर्धिनी हायस्कुल येथे भारताचे 11 वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक एस.एन घोडके यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी पर्यवेक्षक व्ही.एम बांगे, एस.पी घुमाळे, एम.एस जाधव,कलाशिक्षक एन.आर जवळे,कार्यालय प्रमुख पी.के उपासे यांच्या सह शिक्षकेत्तर कर्मच्या री गफुर कोतवाल राम बेळकेरे उपस्थिती होती.