भाजपा महिला उदगीर तालुका अध्यक्षपदी वंदना गरड
उदगीर/ प्रतिनिधी
येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या वंदना यातील गरड यांची त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन भाजपा जिल्हाध्यक्ष आ.रमेश अप्पा कराड यांनी उदगीर तालुका महिला आघाडी च्या तालुकाध्यक्षपदी वंदना गरड यांची निवड केली. याप्रसंगी भाजपा महिला आघाडी प्रदेश सचिव मिनाक्षी पाटील, उदगीर तालुका भाजपा अध्यक्ष बसवराज रोडगे यांची उपस्थितीत ही निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव श्यामला कारामुंगे, मंदाकिनी जीवने, बबीता पांढरे यांची यावेळी उपस्थिती होती. या निवडीबद्दल वंदना गरड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.