उदगीर / प्रतिनिधी
वसुंधरारत्न,राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे दि.१-०९-२०२० रोजी दुपारी नांदेड येथील नारायणा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान वयाच्या १०४व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या जाण्याने संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.काल श्रीक्षेत्र भक्तीस्थळ(अ.पूर) येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.अनेक गावोगावी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यामध्ये सावरगाव(थोर) येथील भाविकांनी सुद्धा कोरोना सारख्या महामारी च्या काळातील सर्व बंधन राखत श्रद्धांजली अर्पण केली.ह्या वेळी समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती. गुरुवर्याचे अगणित कार्य संपूर्ण क्षेत्रात आहेत.महाराष्ट्र,आंध्रप्रदेश,
कर्नाटक,तेलंगणा या राज्यात त्यांचे अनेक भावीक भक्त आहेत.त्यांचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग होता.लाहोर विद्यापीठात स्वतंत्र पूर्व काळात एमएमबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. लिंगायत धर्म प्रसारात ते सतत कार्यरत राहिले.
वृक्ष जोपासना, राष्ट्र धर्म, राष्ट्रप्रेम या त्रिसूत्रीवर त्यांनी काम केले आहे. लिंगायत स्वतंत्र धर्म आंदोलनात त्यांची भूमिका आणि सहभाग महत्वाचा होता. यासाठी राज्यभर लाखोंच्या मोर्चाचे त्यांनी नेतृत्व केले होते.त्यांनी काही ग्रंथरचना करून मराठी वीरशैव साहित्यात भर घातली आहे. महाराष्ट्रात शिवसांप्रदायिक कीर्तन ते स्वतः करत.अनेक कीर्तनकारांना तयार करण्याचे श्रेय त्यांना जाते. 'श्रीसिद्धान्तशिखामणी'वर संस्कृत व्याख्या लिहिणारे पंडित अशी त्यांची ख्याती आहे.असे असंख्य उपक्रमात गुरुवार्यांनी केले.महाराजांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर येथे उपस्थित मा.विरेश रमाकांत बारोळे हे असे म्हणाले की,आदरणीय गुरुवर्य आप्पा यांच्या जाण्याने सर्व समाजबांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे,आपल्या परिसरातील आध्यामित छत्र हरवले असे विरेश रमाकांत बारोळे ह्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.