तेरा दिवसाच्या भाच्चीला पाण्यात बुडवून मामाने केला खून

तेरा दिवसाच्या भाच्चीला पाण्यात बुडवून मामाने केला खून



चाकूर / प्रतिनिधी


 


चाकूर तालुक्यातील दिनांक,३१/०८/२०२० रोजी


झरी (बु जरूक) येथे 13 दिवस झालेल्या चिमुरडीला चक्क पाण्याच्या टाकीत टाकून मारल्याची घटना घडली आहे. सतत का रडतेस म्हणून मामाने 13 दिवसाच्या भाच्चीला पाण्याच्या टाकित बुडवून केला खून


दुर्दैव म्हणजे मुलीच्या मामानेच सारखी रडतेस का म्हणून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. 


चाकूर तालुक्यातील हुगडेवाडी येथील महिला ही बाळंतपणासाठी झरी (बु जरूक) येथे माहेरी आली होती. तेरा दिवसांपूर्वी ती बाळंतीणही झाली. शनिवारी सकाळी ही चिमुरडी ही गायब झाली. कुटुंबातील सदस्यांनी मुलीचा शोधाशोध सुरू झाला. घरालगतच असलेल्या एका पाण्याच्या टाकीत चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक अवस्थेत चाकूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी या घटनेची उकल केली असता माणुसकीला काळिमा फासेल असे सत्य समोर आले आहे. या चिमुरडीचा मामा कृष्णा अंकुश शिंदे विस वर्षाच्या मामा यानेच सतत रडतेस का म्हणून तिला पाण्याच्या टाकीत टाकले.मामा या नात्याला काळीमा फासनारी हि घटणा मामा


म्हणावतर कोणाला आसा प्रश्न निर्मान होत आहे