लातूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीतर्फे
लातूर येथे राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
5 सप्टेंबर म्हणजेच भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून लातूर येथे आदर्श शिक्षक समितीचा राज्य स्तरीय आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन मा. राहुलजी केंद्रे जिल्हा परिषदचे अध्यक्ष यांच्या निवासस्थानी करण्यात आला.. कोरोना जागतिक महामारी च्या पार्श्वभूमीमुळे सोशल डिस्टंश नियमांचे पालन करुन छोटेखानी परन्तु लक्षवेधी कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. राहुलजी केंद्रे होते
अध्यक्षीय समारोप करताना श्री.राहुल केंद्रे म्हणाले कि, आधुनिक भारताच्या जडणघडणीत गुरुजणांचा महत्वाचा वाटा आहे.मुलांचा विश्वास सर्वात जास्त आपल्या गुरूंवर असतो.चांगले संस्कार गुरुजन आपल्या विधार्थ्यांवर करत असतात.गुरु सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.आज मी आपणास शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा *सौ. भारतबाई सोळुंके उपाध्यक्षा जिल्हा परिषद लातूर, सभापती कृषी गोविंदराव चिलकूरे, रोहीदास वाघमारे सभापती समाज कल्याण, माजी समाज कल्याण सभापती संजय जी दोरवे, आदर्शचे माध्यमिक विभागाचे प्रमुख महेश तांदळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातील शैक्षणिक, राष्ट्रीय व सामाजिक उल्लेखनीय कार्य करणारे 43 उपक्रमशील शिक्षकांना मान्यवरांच्या शुभहस्ते आदर्श शिक्षक समिती पुरस्कृत *राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार* देऊन गौरविण्यात आले
दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन *श्री मारोती लांडगे ता.अध्यक्ष उदगीर* यांनी केले. आभार प्रदर्शन श्री वाल्मिक पंदे जिल्हा सरचिटणीस यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदर्श शिक्षक समितीचे तडफदार जिल्हा अध्यक्ष *श्री चंदु घोडके, सरचिटणीस वाल्मिक पंदे, कार्याध्यक्ष बापुराव चामले, जिल्हा उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बडगे,श्री गंगाधर बिरादार, मराठवाडा अध्यक्ष गंगाधर साखरे, उदगीर अध्यक्ष श्री मारोती लांडगे, देवणी राजकुमार कुंभारकर, जळकोट नामदेव चोले, अहमदपूर डी.के.देवकत्ते, ज्ञानेश्वर तोंडचीरे, रेणापूर तोटावार* आदी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. निवड झालेल्या सर्व आदर्श शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले