उदगीर / प्रतिनिधी
कोरोना महामारीचे गांभिर्य लक्षात घेऊन देशात सर्वत्र काळजीचे व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजाचा एक घटक म्हणून आपण सामाजिक जबाबदारी जपले पाहिजे व कोरोनाला हरवले पाहिजे.म्हणुनच
शासनाने ही सार्वजनिक कार्यक्रमावरती निर्बंध लादले आहेत आणि ते पाळणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. या बाबीचा विचार करता माझी मुलगी जिजा ( जिजा मदन पाटील ) चा प्रथम वाढदिवस मोठ्या पद्धतीने साजरा न करता तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी व त्यावर यशस्वी मात करण्यासाठी छोटेसे प्रयत्न म्हणून उदगीर तालूक्यातील नागरीकांचा ज्यांचा संपर्क येतो आशा उपजिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, येथील सर्व कर्मचारी यांना उदगीरचे उपजिल्हाधीकारी श्री. प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार श्री.व्यंकटेश मुंडे व नायब तहसीलदार राजाभाऊ खरात या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मेडीकल कीट चे वाटप करण्यात आले व प्रभाग क्र.18 येथे ही सर्व नागरिकांना मेडीकल कीटचे वाटप करण्यात आले.
( या कीट मध्ये कापडी पिशवी, 2 फेसमास्क, 1 सेनिटायझर बॉटल, हॅन्डगोल्ज, हॅन्डवॉश साबण व चॉकलेट ) इत्यादी साहित्य देऊन माझ्या मुलीचा ( जीजा ) चा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, राज्यमंत्री संजयभाऊ बनसोडे यांचे स्वीय सहाय्यक अॕड.पदमाकर उगीले, काँग्रेस चे सोशल मेडीया प्रमुख प्रा.आमोल घुमाडे व मित्र परीवार उपस्थित होते.