उदगीर / प्रतिनिधी
उदगीर येथे प्रति वर्षा प्रमाणे या वर्षी आज शुक्रवार २८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता पारकट्टी गल्लीतील आजोबा गणपतीच्या महाआरती ने श्री विसर्जनाला सुरुवात झाली, कोरोंना मुळे कुठलीही मिरवणूक काढण्यात येणार नसून नगरपालिका तर्फे गणेश मंडळा च्या जागेवर जाऊन पर्यावरण पूरक टाकीत श्री विसर्जन करण्यात येत आहे
उदगीर येथे आज ७ व्या दिवशी श्री विसर्जनाला पारकट्टी गल्ली येथील आजोबा गणपतीची आरती पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अतरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपजिल्हाधिकारी डॉ. प्रविण मेंगशेट्टी, नपा मुख्याधिकारी भारत राठोड, तहसीलदार वेंकटेश मुंडे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांनी करून सकाळी ११ वाजता सुरुवात केली, नगर परिषद तर्फे शहरातील गणेश विसर्जनासाठी १८ ट्रॅक्टर सजवून प्रत्येक ट्रॅक्टर मध्ये पर्यावरण पूरक पाणी टाकी ठेऊन ते वाहन प्रत्येक गणेश मंडळाच्या ठिकाणी जाऊन त्या टाकीत श्री विसर्जन करण्यात येत आहे या साठी नपा मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक ट्रॅक्टर वर १ निरीक्षक, ५ कर्मचारी, १ पुजारी व १ चालकाची व्यवस्था केली असून यातच श्री विसर्जन करण्यात येत आहे. कोरोंना मुळे या वर्षी प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करत श्री विसर्जनाला सुरुवात झाली आहे, उदगीर चे उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत चव्हाण यांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे