ग्रामस्थांनी कोरोना संसर्गाच्या संदर्भात प्रशासनाचे आदेश पाळावेत-- डी वाय एस पी जवळकर

ग्रामस्थांनी कोरोना संसर्गाच्या संदर्भात प्रशासनाचे आदेश पाळावेत-- डी वाय एस पी जवळकर


उदगीर / प्रतिनिधी


 


 


 


 



लातूर जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर 15 जुलैपासून पुन्हा लाकडाऊन सुरू करण्यात आला आहे. या दरम्यानच्या काळात नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे. कोरोनाला घाबरू नका, मात्र काळजी घ्या. अनावश्यक घराबाहेर फिरू नका. असे आवाहन उदगीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर यांनी केले. ते उदगीर तालुक्यातील कुमठा आणि तोंडार येथे आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा घराचा परिसर सील करण्यासाठी व इतर नागरिकांना कोरोना च्या संदर्भात जनजागृती साठी आले असता बोलत होते. उदगीर पासुन जवळच असलेल्या तोंडार येथे स्वतः हजर राहून कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णाच्या घरा भोवतीचा परिसर सील करण्यात आला.  या परिसरातील लोकांनी घराबाहेर पडू नये. त्यांना लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या संदर्भात त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाची संपर्क साधून जीवनावश्यक वस्तू मागून घ्याव्यात. असेही आवाहन केले. गाव पातळीवर पुन्हा अँटी कोरोना फोर्स सुरू करावा. असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. कंटेनमेंट झोनमधील एकही व्यक्ती कोणत्याही कारणाने दुसर्‍या प्रभागात जाणार नाही. याची काळजी घ्यावी. असे हे आवाहन केले.