वंचित बहुजन आघाडी उदगीरच्या वतीने माजी आ. भालेरावचा जाहीर निषेध 


 


 


उदगीर /प्रतिनिधी


 


 वंचित आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करताना उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी अपशब्द वापरल्याने वंचित बहुजन आघाडी उदगीर च्या वतीने उपजिल्हाधिकारी उदगीर यांच्या मार्फत तीव्र निषेध नोंदवण्यात आला. उपजिल्हाधिकारी उदगीर यांना निषेध निवेदन देताना वंचितचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. अतुल धावारे यांनी सुधाकर भालेराव यांनी त्वरित माफी मागावी. अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील. असा इशारा दिला. यांच्या समवेत जिल्हा प्रवक्ते डॉ संजय कांबळे, ता. अध्यक्ष पी. डी. कांबळे,शहराध्यक्ष दिलीप कांबळे, सचिन जाधव ,संजय भालेराव, बाळा जाधव आदी उपस्थित होते.