उदगीर/ प्रतिनिधी
श्यामलाल स्मारक कनिष्ठ महाविद्यालय, उदगीर आपल्या यशाची परंपरा कायम राखून एच.एस.सी.बोर्ड 2020 च्या निकालात स्थान कायम ठेवले असून विज्ञान शाखेचा 91.07% कला शाखेचा 90% निकाल आहे. विज्ञान शाखेतून महाविद्यालयातून शेळके गौरव संजय (सर्वप्रथम) माने सचिन वैजनाथ( द्वितीय) तर कला शाखेतून केंद्रे पूजा ज्ञानोबा (सर्वप्रथम)मंचेवाडे अंकिता अंकुश (द्वितीय)कंजे पुष्पांजली रामदास (तृतीय)आले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन.संस्थाअध्यक्ष अँड. सुपोषपाणि आर्य,उपाध्यक्ष गिरीष मुंडकर सचिव अँड. विक्रम संकाये सहसचिव सौ.अंजुमणि आर्य,प्राचार्य चोबळे ए.डी.यांनी केले.
निकालाची परंपरा कायम ठेवण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.डी.एल.सपाटे,प्रा.बी.एम.खंदारे,प्रा.एस.व्ही.घोगरे, प्रा.एम.आर.मोघेकर,प्रा.एस.एन.सगर,प्रा.पी.बी.पाटील, प्रा.एस.जे.पाटील,प्रा.एस.आय.सोनकांबळे यांनी परिश्रम घेतले.
इ.12 वी.उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थापदाधिकारी शिक्षक,शिककेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.