कोरोना योद्धे म्हणून उदयगिरि मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलच्या डॉक्टरांचा गौरव 


 


 


उदगीर / प्रतिनिधी


 


 उदगीर येथील शेल्हाळ रोडवर असलेले उदयगिरि मल्टीस्पेशालिटी या हॉस्पिटल मधील डॉक्टरांचा नुकताच प्रहार जनशक्ती या पक्षाच्या वतीने कोरोना योद्धे म्हणून सन्मानपत्र देऊन,त्या डाॅक्टरांच्या चमुने कोविड 19 प्रतिबंधासाठी केलेल्या आदर्श कार्याचा  गौरव करण्यांत आला.                                               उदगीर येथील उदयगिरि मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे कार्यरत असलेले डॉ. माधवराव चंबुले, डॉक्टर रमण रेड्डी,  डॉक्टर रेखा रेड्डी, डॉक्टर श्रीनिवास बलशेटवार, डॉक्टर लक्ष्मण ढोकाडे यांना कोरोना सन्मानपत्र देऊन, प्रहार जनशक्ती पक्ष शाखा, उदगीर यांच्यावतीने या सर्व डॉक्टरांचा नुकताच गौरव  करण्यांत आला.डाॅ.चंबुले हे सामाजिक जाणीवा जपणारे शहरातील ख्यातनाम डाॅक्टर आहेत.त्यांचा आदर्श घेवून,त्यांच्या कार्यात सतत सहकार्य करणारे हे सर्व डाॅक्टर आदर्श आहेत. सध्या कोरोना या संसर्ग रोगाने भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला घेरलेले आहे.  कोरोना संसर्ग रोग सुरू झाल्यापासून ते आज तागायत या हॉस्पिटलच्या वतीने या संसर्ग रोगाच्या काळात 24 तास हॉस्पिटल खुले ठेवून, रुग्णांना सेवा  देण्याचे काम केलेले आहे. उदगीर शहरातील 24 तास सेवा देणारे हे पहिलेच हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी कोरोना संसर्ग रोग चालू असताना देखील आपल्या स्वतःच्या जीवाची व कुटुंबाच्या जीवाची  परवा न करता 24 तास हॉस्पिटल खुले ठेवून,  या हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांना सेवा देण्याचे काम या हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर व तसेच संपूर्ण कर्मचारी यांनी  केलेले आहे.वेळप्रसंगी सर्व डाॅक्टर आणि कर्मचार्‍यांनी कोरोना सदश्य लक्षणे दिसत असतांना रूग्णांना प्राथमिक उपचार करून कोविड रूग्णालयात पाठवून दिले आहे.रूग्णाला केंद्र बिंदु माणुन सेवा देणार्‍या या देवदुतांच्या कार्याची  दखल घेऊन प्रहार जनशक्ती पक्ष शाखा उदगीर यांच्यावतीने या सर्व डॉक्टरांना कोरोना योद्धे हा पुरस्कार देऊन,  त्यांचा गौरव करण्यांत आलेला आहे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष शाखा उदगीर चे कार्याध्यक्ष रविकिरण बेलकुंदे , पत्रकार अंबादास अल्लमखाणे यांची उपस्थिती होती. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सहकार महर्षि स्व.रामचंद्र उर्फ भाऊसाहेब तालुका खरेदीविक्री सहकारी संघाचे चेअरमन भरतभाऊ चामले,सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब नावाडे,प्रा.प्रविण भोळे,ग्रंथमित्र सुर्यकांत शिरसे, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे नेते युवराज कांडगिरे ,भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण फुलारी भालके, प्राध्यापक चंद्रशेखर मल्कमपट्टे, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते रामेश्वर बिरादार नागराळकर इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.