पत्नीने पतीला जिवंत जाळले!!!
त्याचे खरे कारण कोणालाही नाहीच कळले!!!!
उदगीर / प्रतिनिधी
मानवी जीवनात सुख शांती आणि समाधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. तरीही भारतीय आदर्श संस्कृतीमध्ये विवाह संस्था ही अत्यंत महत्त्वाची आहे. या विवाह संस्थेच्या आधारावर भारतीय संस्कृतीचा आदर्शवाद टिकून राहतो. जर काही संस्कृती ही व्यवस्था बिघडली तर स्वैराचार आणि व्यभिचार वाढायला लागतो या सर्व गोष्टीची मूळ कारणे काय याचा शोध घ्यायचे ठरवले तर पुन्हा आपण भोंगळा आदर्शवाद आणि पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार याकडे वळतो त्यामुळे समाजामध्ये घडणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा शोध घ्यायचा झाल्यास स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांचा विचार करणे गरजेचे आहे साधारणतः समाजामध्ये विवाह संस्थेत पती परमेश्वर मानला जात असल्यामुळे पतीला जास्त महत्त्व दिले जाते परिणामतः पती स्वतःला देव समजायला लागतो आणि आपल्या पत्नीने इतरांशी सहज जरी बोलले ती मोकळेपणाने जरी वागली तर त्याच्या पोटात कालवाकालव व्हायला लागते आणि इथेच खऱ्या अर्थाने चारित्र्याच्या संशयावरून बीजे पेरली जातात आणि एक वेळ का चारित्र्याच्या संशयाचे भूत पती देवा च्या डोक्यात घुसले तर मग त्या सुखी कुटुंबाचे उद्ध्वस्त होण्याचे दिवस सुरू झाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कित्येकदा चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला विहिरीत ढकलून दिले किंवा गळफास घेऊन आत्महत्येचा बनाव केला किंवा जिवंत जाळून स्टोअर चा भडका झाला त्यात ती जळाली किंवा विषारी औषध पाजूनही तिने स्वतःचे पहिले आणि आत्महत्या केली असा बनाव सर्रास केला जातो असे असले तरीही लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका घटनेने सर्वांचे डोळे विस्फारले आहेत घटनेच्या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की उदगीर तालुक्यातील शेकापुर येथील एका विवाहितेने आपल्या पतीच्या डोक्यात आपल्याबद्दल चीड निर्माण झालेली आहे असे समजून तो झोपेत असताना त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला यामध्ये तो 90 टक्के जळाल्यामुळे त्याला तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले मात्र गळीताचे प्रमाण जास्त असल्याने तो वाचण्याची शक्यता कमी असल्याचे लक्षात येतात पोलीस प्रशासनाने तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र या जळीत चे प्रमाण जास्त असल्याने तातडीने लातूर पोलिसांनी जळीत व्यक्ती नारायण शंकर शेलार वय 35 वर्षे यांचा मृत्यूपूर्व बयान घेतला त्यावेळेस त्यांनी सांगितले की दारूच्या कारणावरून आम्हाला पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते घटनेच्या दिवशी ही असाच वाद झाला आणि त्या वादातच मी बाजूला जाऊन झोपलो असताना झोपेत माझ्या पत्नीने माझ्या अंगावर पेट्रोल टाकून मला पेटवून दिले त्यामुळे योग्य ती कारवाई करावी असा बयान दिल्यावरून नारायण शंकर शेलार त्याची पत्नी सुनीता नारायण पोलिसांनी अटक केली दारू पितो म्हणून झोपेत असलेल्या पतीला संपवण्याचा कट कारस्थान केले नारायण आणि सुनीताच्या विवाहानंतर काही दिवस या दोघांचा संसार खूप सुखाने चालला या दरम्यान त्यांच्या कुटुंबाच्या वेलीवर दोन सुंदर फुले फुलली मात्र याचे भान न ठेवता या दोन्ही पती-पत्नीने आपापल्या मर्जीप्रमाणे वागण्याचे ठरवल्यामुळे त्यांच्या कुटुंबात निर्माण झाला या घटनेमुळे पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेला आणि एका रात्री झोपेत या मराठी म्हणी प्रमाणे सुनीताने आपल्या पतीच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांची जीवनयात्रा संपवावी म्हणून प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात ती यशस्वी झाली याप्रकरणी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र माने अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव उदगीर पोलीस अधीक्षक मधुकर जवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे पोलीस उपनिरीक्षक पल्लेवड तसेच पोलीस कॉन्स्टेबल नामदेव सारोळे पोलीस नाईक कैलास चौधरी त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे