चंदरअण्णा प्रतिष्ठाणच्या वतीने माजी आ.सुधाकर भालेराव यांचा वाढदिवस साजरा 


  उदगीर / प्रतिनिधी


उदगीर मतदारसंघावर मागील १० वर्ष अधिराज्य गाजवणारे माजी आमदार व लाईफ केअरचे चेअरमन मा.सुधाकर भालेराव यांचा वाढदिवस आज दि. १९ जून रोजी संपूर्ण उदगीर मतदारसंघा सोबत श्री क्षेत्र महादेव मंदिराचे अध्यक्ष तथा चंदरअण्णा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत पाटिल यांच्या निवासस्थानी वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम सहकारमहर्षी तथा वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांतआण्णा वैजापूरे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन भालेराव साहेबांचा सत्कार करण्यात आला व यानंतर माजी आ. सुधाकर भालेराव यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांना उपस्थित सर्वांनी शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर याप्रसंगी मासिक अनुभव मंटपाचे अध्यक्ष मा.राजकुमार बिराजदार यांच्या लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचाही सत्कार करण्यात आला. 


                       यावेळी नगर सेवक अँड. सावंत पस्तापूरे, साईनाथ चिमेगावे, आमोल भालेराव, युवा नेते बाळासाहेब पाटोदे, सय्यद शकील, डॉ. विजयकुमार बिरादार, माधव टेपाले, कल्याण बिरादार, खंडोमलके रमेश,मुंडे सर इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक सिध्देश्वर पटणे, जनकराज जीवणे, बसव मंटपचे अध्यक्ष राजकुमार बिरादार, नागरगोजे, बालाजी जलमपूरे, दै. एकजूट लोकजागृतीचे संपादक महादेव घोणे,या कार्यक्रमाचे संचलन प्रा.सिध्देश्वर पटणे यांनी केले तर आभार श्रीकांत पाटील यांनी माडंले...


Popular posts
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image
प्रभाग क्र . 20 मधून राजू भोसले यांनी काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज मतदारांमध्ये जोरदार चर्चा
उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू — महायुतीमध्ये उमेदवारीवरून नाराजगी सूर
Image
तोगरी पंचायत समितीसाठी अंकुश ताटपल्ले पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
Image
तिवटग्याळ ग्रामविकासात सरपंच प्रशांत पाटील यांचे उल्लेखनीय योगदान – ‘आदर्श सरपंच’ पुरस्कारासाठी योग्य दावेदार
Image