रजिस्ट्री कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी लय भारी !! कोरोना संसर्गाची घेत नाहीत खबरदारी !!!


उदगीर / प्रतिनिधी


 


 


 


उदगीर शहरातील रजिस्ट्री कार्यालयात सध्या मोठ्या प्रमाणात जनतेची ये जा चालू आहे. मात्र या येणाऱ्या नि जाणाऱ्या लोकांना सोशल डिस्टंसिंग आणि कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून, घ्यावयाच्या काळजीच्या संदर्भात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना चक्क पायदळी तुडवल्या जात आहेत. या कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी सॅनिटरायझिंग ची सुविधा  नाही,ना हात धुण्याची व्यवस्था केलेली नाही. इतकेच नाही तर सोशल डिस्टंसिंग चे तीन-तेरा वाजवले जात आहेत. प्रशासनाच्या वतीने दिलेल्या सूचना जर पाळल्या जात नसतील तर अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करणे गरजेचे आहे. उदगीर शहरात कोरोना संपण्याच्या परिस्थितीमध्ये असताना लोकांच्या गलथान कारभारामुळे पुन्हा हात पाय पसरू लागला आहे. या लोकांच्या गलथानपणा ला रोखण्यासाठी संबंधित कार्यालयातील प्रमुख व्यक्तींनी नियोजन करणे गरजेचे आहे. असे असतानाही रजिस्ट्री कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी कोणीही  कसलीच खबरदारी घेत नसल्याचे दिसून येत आहे. या बाबीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अशी चर्चा उदगीर शहरात मोठ्या प्रमाणात चालू आहे.