उदगिरी /प्रतिनिधी
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे व त्यातल्या त्यात भर उन्हाळ्यात हा आजार संपूर्ण देशात पसरल्यामुळे सर्व व्यापारी, मजूर, शेतकरी,सर्व कष्टकरी यांचे काम बंद झाल्यामुळे त्यांची आर्थिक बाजू कमकुवत झाल्यामुळे त्यांना उन्हाळ्यात विकत पाणी घेणे शक्य नव्हते. ही बाब येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप अशोकराव कोयले मित्र मंडळाच्या लक्षात येताच त्यांनी निडेबन गावात डोअर टू डोअर जाऊन गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून दररोज तीस हजार लिटर पाणी वाटप करण्याचे कार्य मित्र मंडळाचे अविरतपणे चालू आहे. यासाठी मित्रमंडळाचे प्रवीण वंगाटे, पवन कलमे, मनोज जोशी, संगमनाठ पांचाळ, संदीप मद्दे, युवराज कांडगिरे, संदीप राठोड, शेखर भंडारे,भरत कोयले यांच्यासह अनेकांनी निडेबन गावातील लोकांच्या मोफत पिण्याच्या पाण्याची सोय केल्याबद्दल त्यांचे निडेबन ग्रामस्थांमधून व सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.