अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या संदर्भात मत जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.-विरेश बारोळे
उदगीर / प्रतिनिधी
उदगीर-कोरोना सारख्या महाभयंकर विषाणू चे संकट दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. या महाभयंकर स्थितीमध्ये परीक्षा घेणे कितपत योग्य आहे?परीक्षा झाल्या नाही तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय? यासारखे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत. महाराष्ट्र सरकारने प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना पुढील वर्षांत प्रमोट करून, फक्त अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, माननीय उच्चशिक्षणमंत्री उदयजी सामंत साहेबांनी यूजीसी कडे अंतिम वर्षातील परीक्षा रद्द कराव्या यासाठी पत्र लिहिले आहे, यावरती भविष्यामध्ये परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या निर्णयाला विरोध करत आहे.ही सर्व परिस्थिती गेल्या काही दिवसांमध्ये निर्माण झाली आहे.परंतु अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या संबंधित काय मत आहे,हे जाणून घेणे पण महत्त्वाचे आहे? त्यांना काय वाटतं आहे? त्यांची काय मानसिकता आहे?अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की,यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा सर्वे करावा त्यांना काय वाटत आहे याविषयी जाणून घ्यावं. कारण परीक्षेला सामोरे हे अंतिम वर्षातील विद्यार्थी जाणार आहेत.त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांचा मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्याची गरज आहे.मी विरेश रमाकांत बारोळे अंतिम वर्षातील विद्यार्थी या नात्याने आपल्या सरकारकडे एक विनंती करू इच्छितो की,आपण अंतिम वर्षांतील विध्यार्थ्यांचे काय मत आहे ह्यासाठी ऑनलाईन सर्वे करावा आणि अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे मत काय आहे हे जाणून घ्यावे अशी विनंती सर्व अंतिम विद्यार्थ्यांच्या वतीने करत आहे.आजच्या परिस्थितीमध्ये अंतिम वर्षांतील असंख्य विद्यार्थी ज्याठिकाणी कोरोणाचा प्रादुर्भाव हा जास्त आहे अशा ठिकाणी अंतिम वर्षातील विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा विचार जाणून घ्यावा.आणि लवकरात लवकर कोरोनाची सद्यपरिस्थिती व विद्यार्थ्यांचे भवितव्य या दोन्ही गोष्टींचा विचार करून अंतीम वर्षांतील विद्यार्थ्यांसाठी निर्णय घ्यावा व विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करून विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा ह्यासाठी अंतिम वर्षातील विद्यार्थी या नात्याने मी विरेश रमाकांत बारोळे याची मागणी करतो.