*राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या वतीने गरजुनां अन्नधान्याचे किट वाटप*
उदगीर / प्रतिनिधी
दि. ०५ महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण राज्य मंत्री संजय बनसोडे यांच्या वतीने शहरातील गरजु व गोरगरीब कुटुंबांना अन्नधान्याच्या किट चे वाटप करण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.शिवाजीराव मुळे, ज्ञानेश्वर पाटील, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, पंचायत समिती सदस्य माधव कांबळे, सतिश पाटील मानकीकर उपस्थित होते.