भाजपा किसान मोर्चा सरचिटणीसपदी फुलारी यांची निवड

भाजपा किसान मोर्चा सरचिटणीसपदी फुलारी यांची निवड


उदगीर / प्रतिनिधी


 


 


  उदगीर तालुक्यातील शेकापुर  येथील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते लक्ष्मण फुलारी यांची किसान मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी जाहीर करून त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान केले आहे.


       जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे,  प्रदेश उपाध्यक्ष गोविंदअण्णा केंद्रे,  आ.अभिमन्यू पवार, माजी आ. विनायकराव पाटील,नागनाथअण्णा निडवदे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भैया केंद्रे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे सुधाकर भालेराव रामभाऊ तिरूके, जेष्ठ नेते हावगीराव पाटील, तालुका अध्यक्ष बस्वराज रोडगे. जी.प.सदस्य बस्वराज पाटील कौळखेडकर, बापूसाहेब राठोड यांच्यासह जिल्ह्यातील इतर नेत्यांच्या सहमतीने  जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी लातूर जिल्हा  कासान मोर्चाच्या सरचिटणीसपदी  उदगिर येथील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते लक्ष्मण फुलारी  यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी अनेक जण उपस्थित होते.