मासीक अनुभव मंटपच्या उदगीर तालुका सचिव पदी श्रीकांत पाटील यांची नियुक्ती
उदगीर प्रतिनिधी
उदगीर येथील दि. 05/05/2020 रोजी महाराष्ट्र बसव परिषद हिरेमठ संस्थान, भालकी आणि मासिक अनुभव मंटप उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने बसव व्याख्यान मालेचे 85 वे पुष्प वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष, सहकार महर्षी मा.चंद्रकांतआण्णा वैजापुरे यांच्या अध्यक्षतेखाली व कार्यक्रमाचे दासोही श्री क्षेत्र महादेव मंदिर, विकास नगरचे अध्यक्ष मा.श्रीकांत पाटील यांच्या निवासस्थाना वरून फेसबुक ऑनलाईन गुंफण्यात आले. कोरोनाच्या भीषण संकटामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम न घेता, शासनाच्या नियमाच्या अधीन राहून राजकुमार बिरादार यांच्या व्याख्यानाचे थेट फेसबुक लाईव्ह प्रेक्षपण करण्यात आले. मा.राजकुमार बिरादार यांनी बसव तत्वातून कोरोना मुक्ती या विषयावर आपले सखोल विचार मांडले.
व्याख्यान संपन्न झाल्यानंतर उदगीर येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, सर्वांच्या सुखदुःखात सदैव सहभागी राहणारे व विकास नगर मधील सर्व समस्या सोडविण्यासाठी सतत पुढाकार घेणारे, विकास नगरच्या विकासाचा ध्यास घेऊन, विकासाचा विडा उचललेले विकास नगर येथील श्री क्षेत्र महादेव मंदिराचे अध्यक्ष श्री.श्रीकांत पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची उदगीर तालुका मासीक अनुभव मंटपच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र लिंगायत समाजाचे अध्यक्ष, सहकार महर्षी मा.चंद्रकांतआण्णा वैजापुरे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी माजी उपनगराध्यक्ष शिवराज पाटील, उद्योगपती विमलताई गर्जे, गुंडप्पा पटने सर, प्रा.प्रदीप वीरकपाळे, राजकुमार कपाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. श्रीकांत पाटील यांच्या या निवडीमुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.