सोमनाथपुर येथील मुख्य रस्त्याची दुरावस्था, जि. प. अध्यक्ष राहूल भैय्या केद्रे यांना ग्रामपंचायतीच्या वतीने मागणी

सोमनाथपुर येथील मुख्य रस्त्याची दुरावस्था, जि. प. अध्यक्ष राहुल भैय्या केंद्रे यांना ग्रामपंच्यायत च्या वतीने मागणी


 


उदगीर / प्रतिनिधी



 


नांदेड रोडवर उदयगिरी महाविद्यालयाचे बाजूने मौजे सोमनाथपूर याकडे गावात जाणारा या मुख्य रस्त्याची  दुरावस्था झाल्यामुळे, या भागातील जाणारे-येणारे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबतीत अनेक निवेदन देऊन देखील, त्याचा अध्याप पावेतो काहीच फायदा झालेला दिसून येत नाही.                                                        मौजे सोमनाथपूर तालुका उदगीर हे गाव उदगीर पासून अंदाजे चार किलोमीटर अंतरावर आहे. येथे ग्रामपंचायत पण आहे. याच भागात पुरातन महादेव मंदिर व तुळजाभवानीचे मंदिर हे पण आहेत. हे दोन्ही मंदिर पुरातन काळापासून जशास तसेच आहेत. या दोन्ही मंदिराला  आज पर्यंत पुरातन म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारचा कसलाच निधी उपलब्ध झालेला  नसुन मंदिराचा जीर्णोद्धार पण झालेला नाही. या दोन्ही मंदिरास दर्शनासाठी भाविक लोक हे मराठवाडा व कर्नाटक राज्यातून येतात. येणाऱ्या भाविकासाठी या दोन्ही मंदिरात  कसलीच व्यवस्था नाही. त्याचप्रमाणे गणपतीचे मंदिर पण हे पुरातन आहे. याच भागात गोरक्षण संस्था ही  पण अधिक काळा पासुन  पहावयास मिळते. त्याप्रमाणे याच भागात वजन मापे व दारूबंदीचे कार्यालय पण आहेत. त्यामुळे या भागात भाविकांची  व ऑफिसच्या कामासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची  दररोज वर्दळ सुरूच असते. तसे पाहिल्यास या गावच्या विकासाकडे महाराष्ट्र शासनाचे व प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे हा भाग मागासवर्गीय  व भटक्या विमुक्त जातीचा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नामदार वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांनी काही प्रमाणात लक्ष घालण्याचे प्रयत्न केले होते. त्यानंतर या गावाकडे सतत दुर्लक्ष होत  गेले.पूर्वीचे जे सोमनाथपूर  होते तेच सोमनाथपूर आजही पहावयास जशास तसे दिसून येते. या सोमनाथपुरला जाणे-येण्यासाठी मुख्य दोन रस्ते आहेत. त्यापैकी पहिला मुख्य रस्ता हा उदयगिरि महाविद्यालयापासून तर दुसरा रस्ता अण्णाभाऊ साठे या चौकातून  सोमनाथपुरला जाण्या-येण्यासाठी वापरला जातो. ऑफिसच्या कामासाठी व दोन्ही मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांची दररोज गर्दी दिसून येते. तर गावातील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी याच रस्त्याचा अवलंब करावा लागतो. आज पाहिल्यास या दोन्ही बाजूचे रस्ते हे  उखडले असून रस्त्यात  मोठ मोठे खडृडे  पडलेले आहेत. या रस्त्याच्या मागणीसाठी बरेच वेळा नागरिकांनी व ग्रामपंचायतीनी मागणी केलीली होती. परंतु याकडे सतत दुर्लक्ष होत गेले आहे. तरी लातूर जिल्ह्याचे तरुण तडफदार जिल्हा  परिषद अध्यक्ष माननीय राहुलभैया केंद्रे यांनी याकडे  लक्ष घालुन  त्वरित रस्ता हा पावसाळ्याच्या अगोदर करून द्यावा अशी मागणी या भागातील नागरिकांची व ग्रामपंचायतीने केलेली आहे.  हा रस्ता त्वरित  करावा  याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.