लाईफ केअरच्या माध्यमातून गोरगरीबांची सेवा व्हावी राज्यमंत्री संजय बनसोडे

लाईफ केअरच्या माध्यमातून गोरगरीबांची सेवा व्हावी


राज्यमंत्री संजय बनसोडे


उदगीर / प्रतिनिधी


 



 


उदगीर, दि. ३० - येथील तीन राज्याच्या सीमेवर असलेले लाईफ केअर हाॅस्पिटल हे अत्याधुनिक सोईनियुक्त मराठवाड्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे ठिकाण भविष्यात ठरावे असे मत राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले आहे. ते उदगीर येथील लाईफ केअर हाँस्पिटलच्या एस.बी.क्रिएटिव्ह केअर लि.च्या उद्धाटन प्रसंगी बोलत होते


 


 


 यावेळी बाळासाहेब जाधव ( माजी मंत्री महाराष्ट्र राज्य ), बसवराज पाटील नागराळकर ( प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस), सुधाकर भालेराव ( माजी आमदार ), टि. पी. कांबळे ( माजी आमदार ), नागनाथ अण्णा निडवदे, बसवराज बागबंदे ( नगराध्यक्ष ), गिरीश पाटील, मुक्तेश्वर धोंडगे, रामचंद्र तिरूके, धर्मपाल देवशेट्टे, मन्मथ अप्पा किडे, संतोष तिडके, अमोल भालेराव, राहुल देबडे, डॉ. सुनिल माने यांच्या सह अनेक मान्यवर डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, व पञकार बांधव उपस्थित होते.


 


 


यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले


या रूग्णालयात विविध आजारावर उपचार होणार असुन शासकीय योजनेचीही अमलबजावणी या रूग्णालयात होणार आहे. आता महागडी शस्त्रक्रिया असो की गरोदर मातांचे व लहान बालकांचे आजार या सर्वांवर येथे उपचार होणार असुन या रूग्णालयाने उदगीर शहरातील गोरगरीब लोकांची सेवा करुन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम करावे व रूग्णांना नवसंजीवनी द्यावे. 


 


यावेळी या रूग्णालयात उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेण्यात आला, रुग्णालयातील डायलिसिस वार्ड, क्रिटिकल वार्डला, तसेच इतर विभागांना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी भेट दिली.