वाढवना खुर्द प्राथमिक आरोग्य उप केंद्रास जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिली भेट
रुग्ण सेवेत तत्पर राहावे असे दिले निर्देश
उदगीर / प्रतिनिधी
उदय गर्जना नेटवर्क न्युज
सध्या देशभरात कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून पुण्या मुंबई मध्ये असणारा आजार हा ग्रामीण भागात पोहोचला असून जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा उत्तम पणे काम करत आहे.
आज वाढवना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी भेट दिली व *आपली आरोग्य यंत्रणा ही गोरगरीब, जनसामान्य लोकांसाठी असून ग्रामीण भागात चांगली सेवा दयावी, लोकांना वेळोवेळी चांगले उपचार द्यावेत व रुग्ण सेवेसाठी सतत तत्पर असावे असे निर्देश दिले*. यावेळी त्यांच्या सोबत उदगीर पंचायत समिती चे माजी उपसभापती रामदास भाई बेंबडे, उदगीर भाजप शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर, उपसरपंच माऊली भांगे, रऊफ शेख,युवा मोर्चा चे विशाल रंगवाळ, विकास जाधव, भाजप अल्पसंख्यांक मोर्चा चे तालुका अध्यक्ष इर्शाद शेख आदींसह वाढवना येथील ग्रामस्थ उपस्थित होते