उदगीर / प्रतिनिधी
लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त उदगीर येथे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे परिवाराच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंच्या 2275 किटचे वाटप राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
• कोरोणा विषाणूचा प्रादुर्भावामुळे लाॅक डाऊन व संचारबंदी जाहीर झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यापासून हातावर पोट असलेल्या गरजू कुटुंबाला माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांच्या वतीने अविरतपणे अन्नधान्याच्या किटचे वाटप चालू आहे. आज पर्यंत एकवीस हजार अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले असून हे कार्य अविरतपणे चालू राहणार आहे.लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त 2275 अन्नधान्याच्या किटचे वाटप सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी,तहसीलदार व्यंकटेश मुंढे, नागप्पा अंबरखाने बँकेचे ब्लड बॅंकेचे अध्यक्ष रमेश अंबरखाने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, बाजार समितीचे उपसभापती रामराव बिरादार, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, शहराध्यक्ष मंजूरखाॅ पठाण, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजयकुमार निटूरे इत्यादी उपस्थित होते.