रफ्तार फाउंडेशनच्या वतीने 6OO पेक्षा आधीक गरजू लोकाना रेशन किटचे वाटप

रफ्तार फाउंडेशनच्या वतीने 6OO पेक्षा आधीक गरजू लोकाना रेशन किटचे वाटप


उदगीर / प्रतिनिधी


रफ्तार फाउंडेशन कायम गोरगरिब जनतेच्या मदतीला धावुन येते. कोरोनाच्या महा भयंकर संकट काळात तरी कसे मागे राहणार, कायम सामाजिक बाधिलकी जोपासत लाॅक डाउनमुळे हातावर पोट असणार्‍या शेकडो गोरगरिब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. भुकबळी होउनेय यासाठी रफ्तार फाउंडेशन गरिबाना अन्नधान्य देवुन त्यांच्या मदतीला धाऊन येत आहे. आजपर्यंत ६०० पेक्षा अधिक नागरिकांना रेशन किट देण्यात आले आहे.
           रफ्तार फाउंडेशन ही समाजातील गरजवंताचे हक्काचे व्यासपिठ बनले असुन गेल्या अनेक वर्षा पासुन गोरगरिब जनतेच्या मदतीला धावून जाते. जगभरात कोरोनाने थैमान घातले असल्यामुळे उदगीरसह देशभरात लाॅक डाउन लावण्यात आले आहे. उदगीर शहर रेडझोन बनले असुन जमावबंदी, संचार बंदीसह अनेक उपाय योजना अमलात अनुन कोरोना सक्रमण रोखण्याचा प्रयत्न केला जात असले तरी सर्व घडामोडीत गोरगरीब जनतेवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. अशा या दोहेरी संकट काळात गरिबांच्या मदतीला रफ्तार फाउंडेशनचे इरफान शेख व त्याची टीम उदगीरकरांच्या मदतीला धावुन आली.
             लाॅक डाउनमुळे हातावर पोट असनारे अनेक कुटुंब संकटात सापडले. अशा गरजवंत लोकांच्या मदतीला उदगीरातील अनेक दाते धावुन आले. त्यातच एक नाव उदगीरकरांच्या जवळचे व आपलेशे वाटु लागले ते म्हणजे रफ्तार फाउंडेशन व त्यांची टीम या लाॅक डाउनच्या काळात त्यांनी ६०० पेक्षा अधिक कुटुंबांना अन्नधान्याचे कीट देत मदतीचा हात दिला. उदगीर व शहर परिसरातील शेकडो लोकांना त्यांची मदत मिळाली असून रफ्तार फाउंडेशन व त्यांच्या मित्र परिवारिच्या मदतीने अशीच मदत सुरू राहणार असल्याची माहिती इरफान शेख यांनी दिली असुन गरजुनी मदतीसाठी रफ्तार फाउंडेशनशी संपर्क करावे असे आवहान ही त्यांनी केली आहे.