लाइफ केअर नव्या जोमाने जनतेच्या सेवेसाठी- माजी आ.भालेराव

लाइफ केअर नव्या जोमाने जनतेच्या सेवेसाठी- माजी आ.भालेराव


उदगीर /प्रतिनिधी 


 


 


 उदगीरच्या पंचक्रोशीत अद्यावत लाईफ केअर हॉस्पिटल उभारण्यात आले होते. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे लाईफकेअर काही काळ बंद पडले होते. या हॉस्पिटलची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी हॉस्पिटल नव्या जोमाने गोरगरीब जनतेसाठी सुरू करणार असल्याचे प्रतिपादित केले असून ३० मे रोजी नव्याने शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 


 


    उदगीर तालुका तीन राज्याच्या सीमेवर वसला असून या ठिकाणी कायम विचारांची, राजकीय, सामाजिक व व्यवसायिक आदान- प्रदान होत असते शिवाय या ठिकाणचे नातेसंबंधी ही अरुड असल्यामुळे उदगीर तालुका या सीमावर्ती भागाचा केंद्रबिंदू बनला आहे. कायम वर्दळ व या ठिकाणांची असलेल्या सोयी सुविधांकडे आकर्षित होणाऱ्या सीमावर्ती भागातील नागरिकांना उदगीर हा हवाहवासा वाटतो त्यामुळेच या ठिकाणी सर्व सोयीसुविधा आपसूकच विकसित होत गेले आहेत. उदगीर कायम नवीन दिशा ठरवणारे केंद्रस्थान म्हणून ओळखले जाते शिक्षणाचे उदगीर पॅर्टन असो की राजकीय चळवळ सर्वचआघाड्यांवर आघाडीवर असल्याचे दिसून येते. आरोग्याच्या क्षेत्रात ही वरील प्रगती झाली असली तरी सर्व सोयीसुविधा असलेले रुग्णालय उपलब्ध नव्हते. 


 


     लाइफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ने उदगीरच्या पंचकोशीत नवा इतिहास रचला होता हे रुग्णालय म्हणजे उदगीरकरांसाठी नव्हे तर आंध्र- कर्नाटक व तेलंगणाच्या राज्यातील सीमावर्ती भागातील नागरिकांना आरोग्याचे वरदान ठरले होते. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे हे रुग्णालय संयोजकांना बंद केले होते. उदगीरमध्ये सर्व सोयीयुक्त अद्यावत रुग्णालयने घेतलेली मरगळ झटकून माजी आ. सुधाकर भालेराव यांना हे रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी पुन्हा तन- मन- धन लावुन सुरू करण्यासाठी प्रयत्न करुन अखेर ३० मे रोजी नव्या दमाने शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती भालेराव यांना दिली आहे.