लातूर जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते वाटप
लातुर / प्रतिनिधी
कोरोना विषाणू कोविड 19 या संकटावर मात करण्यासाठी शासनाने संचार बंदीची घोषणा केली आहे.
सदरच्या संचारबंदी च्या काळामध्ये दिव्यांग व्यक्तींची उपासमार होऊ नये म्हणून समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर व रोटरी क्लब लातूर व समाज कल्याण कार्यालय अधिनस्त असणाऱ्या सेवाभावी संस्था संचलित अनुदानित वस्तीग्रह यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
दिव्यांग कल्याण आयुक्तालय,
महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्यवस्था अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे.
अत्यल्प मानधन असलेल्या अनुदानित वस्तीग्रह कर्मचारी व पदाधिकारी यांच्या सहकार्याने 1000 जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप जिल्हाभरात करण्यात येत आहे याची सुरुवात जिल्हा परिषद लातूर येथे दहा गरजू आर्थिक दुर्बल दिव्यांग व्यक्तींना जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतबाई सोळंके, समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, कृषी सभापती गोविंद चिलकुरे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा परिषद सदस्य बापूराव राठोड उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले होते. .
लातूर जिल्ह्यामध्ये दिव्यांग व्यक्तींची संख्या मोठी असून कोराना च्या संकट काळामध्ये अनेक व्यक्तींचे हाल होताना दिसताहेत. दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणे आवश्यक असून याकामी सेवाभावी संस्थांनी समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद लातूर या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले आहे.