कायदा-सुव्यवस्थे सोबतच विश्वासार्हता टिकवणे हे नवीन अधिकार्यापुढे आव्हान
उदगीर / प्रतिनिधी
उदगीर शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनचे दोन्ही पोलीस अधिकारी बदलून गेल्याने नव्याने आलेले शहर पोलीस स्टेशन साठी वसंत चव्हाण तर ग्रामीण पोलीस स्टेशन साठी वाघमारे, या दोन्ही कर्तबगार अधिकाऱ्यांच्या समोर उदगीर मध्ये बिघडत गेलेली कायदा-सुव्यवस्था आणि पोलिस प्रशासना बद्दल जनतेमध्ये निर्माण झालेली अनास्था! दूर करून पोलीस आणि जनता मैत्रीचे संबंध निर्माण करणे. हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासोबतच उदगीर शहर महाराष्ट्र ,कर्नाटका, तेलंगणा या तीन राज्याच्या सीमेवर असल्यामुळे महाराष्ट्र राज्यात बंद असलेल्या अनेक गोष्टींचा दुसऱ्या राज्यातून ऊदगीर शहर आणि ग्रामीण भागात सहज आणि मुबलक प्रमाणात पुरवठा केला जाऊ शकतो. याच धर्तीवर मटका, गुटका, अवैध प्रवासी वाहतूक व अवैध्य दारूअशा बऱ्याच गोष्टी उदगीरमध्ये सर्रास चालू होत्या. एका बाजूला कोरोना चे महासंकट आणि दुसऱ्या बाजूला हतबल पोलीस प्रशासन! अशा चित्रामुळे उदगीर शहरात कोरोनाला हात पाय पसरायला संधी मिळाली. जिल्हा बंदी, राज्य बंदी असतानाही परराज्यातून, पर जिल्ह्यातून हजारोंनी लोक उदगीर शहर आणि ग्रामीण भागात आले. पोलीस प्रशासनाने या गोष्टीला वेळीच आळा घातला असता तर, आज हे चित्र पाहायला मिळाले नसते. भविष्यकाळातही जास्त सजग राहून वेळप्रसंगी थोडेसे कठोर होऊन पोलीस प्रशासनाने काम करणे गरजेचे आहे. विशेष करून अवैध धंद्यांना आळा घालून चोऱ्या, घरफोड्या यांच्यावर मटका जूगाा दारू प्रवासी वाहतूक यावर नियंत्रण ठेवणे आणि ज्या चोऱ्या घरफोड्या झाल्या आहेत. त्यांचा तपास करण्यास प्राधान्य देणे हे गरजेचे आहे. असे झाल्यास उदगीरच्या जनतेला पोलीस प्रशासनाबद्दल आस्था वाटायला लागेल. अन्यथा" ये रे माझ्या मागल्या" अशी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. उदगीर हे संवेदनशील म्हणून जरी संबोधले जात असले तरीही, उदगीर येथील सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक समाज कार्यकर्ते पोलिसांच्या सकारात्मक भूमिकेला साथ द्यायला कधीही तयार असतात. अशा सकारात्मक विचारधारेच्या लोकांना सोबत घेऊन या दोन्ही अधिकाऱ्यांना काम करावे लागणार आहे.अर्थात अवैध धंद्याला मुठमाती द्यावी लागणार आहे.