चैत्य स्मारकास पर्यटनाचा 'ब' दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करणार.
राज्यमंत्री संजय बनसोडे
लातूर / प्रतिनिधी
पानगाव :पानगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्य स्मारकास पर्यटनाचा ब दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न केला जाणार आहे अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
पानगाव येथील नियोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्य स्मारकाच्या बांधकामाची पाहणी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले यावेळी त्यांच्या सोबत लातूर ग्रामीण चे माजी आमदार वैजनाथ शिंदे ,त्रिंबकजी नाना भिसे, यंशवत पाटील (रेणा कारखाना माजी संचालक),बाबासाहेब पाटील, लालासाहेब चव्हाण, आचार्य व्ही.के (अघ्यक्ष, डॉ बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक पानगाव)अमित आचार्य, शिवाजी आचार्य, अर्जुन दांडे, इत्यादी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की पानगाव येथे दर वर्षी लाखो अनुयायी येत आहेत मराठवाड्यातील आंबेडकरी जनतेचे हे श्रद्धा स्थान आहे याचा विकास करण्यासाठी शासन स्तरावर निधी कमी पडु दिला जाणार नाही. दरवर्षी येणाऱ्या अनुयायांना येथे सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील पर्यटनाचा ' ब 'दर्जा मिळवा यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न केला जाणार आहे अशी माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.