शहरातील संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे राज्यमंत्री संजय बनसोडे 

शहरातील संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे राज्यमंत्री संजय बनसोडे



उदगीर / प्रतिनिधी


 शकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. या परिस्थितीत सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे  कोणत्याही अफवावर विश्वास ठेऊ नये , या कठीण प्रसंगी सामाजिक सलोखा राखावा असे आवाहन राज्याचे पर्यावरण राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.


उदगीर शहरात आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, वैद्यकीय उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  संजय ढगे, उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर प्रविण मेंगशेट्टी , उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर ,तहसीलदार तथा कमांडिंग आॅफिसर व्यंकटेश मुंडे,न. प. मुख्याधिकारी भरत राठोड, पो. नि. सोपान सिरसाठ, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, पो. नि. महेश शर्मा, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पवार, डॉ. गायकवाड इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की  उदगीर शहरात कोरोना संक्रमित रूग्ण आढळले आहेत त्या भागातील पन्नास वर्षी वरील मधुमेह, रक्तदाब असणाऱ्या सर्व नागरीकाचे स्वँब तपासणी करण्यात येणार आहेत. या भागातील संपर्कात आलेल्या नागरिकांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. शहरातील हा  परिसर मागील तीन दिवसा पासून सील करण्यात आला आहे या परिस्थितीत नागरिकांना लागणार्या जीवन आवश्यक वस्तू घरपोच देण्यात येणार आहेत  यासाठी नगरपालिकेनी हेल्पलाईन व विशिष्ट नंबर उपलब्ध करून दिले आहेत. तसेच अन्य रुग्णांना  दोन रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत
 विलगीकरण कक्षात ठेवलेल्या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील या ठिकाणी कँन्सलर ची  नेमणुक करण्यात येईल. यावेळी नागरिकांना सर्व जीवन आवश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याच्या सुचना 
यावेळी प्रशासनाला देण्यात आले आहेत  अशी माहिती राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत.