खाजगी डाँक्टर व वैद्यकीय सेवा देणार्यानी सामाजिक जबाबदारी चे भान ठेऊन कार्य करावे
राज्यमंत्री संजय बनसोडे(पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम(उपक्रम)पाणी पुरवठा)
उदगीर / प्रतिनिधी
करोनाच्या पार्श्वभूमीवर उदगीर शहरातील खाजगी डाँक्टर व वैद्यकीय सेवा देणार्यानी या आणीबाणी च्या प्रसंगी सामाजिक भान ठेवून प्रशासनास सहकार्य करावे असे मत राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त .
खाजगी डाँक्टर व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणारे यांच्या सोबत उदगीर येथे बैठक घेण्यात आली यावेळी खाजगी डॉक्टरांना येणाऱ्या समस्या बाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी वैद्यकीय उपसंचालक डॉ माले,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय ढगे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ परगे,वैद्यकीय अधीक्षक डॉ पवार, घन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशन चे डॉ चंबुले लायन्स नेत्र रूग्णालयाचे डॉ रामप्रसाद लखोटीया यासोबतच माजी आमदार सुधाकर भालेराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, काँग्रेसचेजिल्हा अघ्यक्ष व्यंकट बेद्रे, उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी, पोलीस उप अधीक्षक श्री जवळकर, नगरपालिका मुख्यघिकारी भरत राठोड, बी.डी.ओ.अंकुश चव्हाण, तहसीलदार श्री मुंडे उपस्थित होते.
करोना या साथरोग नियंत्रण ठेवण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहे ही आणीबाणची परिस्थिती आहे या काळात राज्यातील सर्व शासकीय यंत्रणा दिवस रात्र काम करीत आहे या परिस्थिती खाजगी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार्या डॉक्टरांनी आपले सहकार्य द्यावे.करोनाच्या पार्श्वभूमीवर उदगीर तालुक्यात भविष्यात करोना हाँस्पिटल, करोना मोबाईल व्हाँन,फिवर क्लिनिक उभे करण्यासाठी सहकार्य व योगदान द्यावे. या परिस्थिती डॉक्टर यांना लागणार्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या साठी निधीची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे . खाजगी डॉक्टर यांनी आपली सेवा बंद करु नये असे निर्देश यावेळी राज्याचे राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी दिले.