अंगणवाडीचा एलईडी अज्ञाताने फोडला"

"अंगणवाडीचा एलईडी अज्ञाताने फोडला"



लातुर : प्रतिनिधी


लातुर तालुक्यातील हरंगुळ (बु) गावातील मंदार विभागात जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेच्या मागील  मैदानात बांधन्यात आलेल्या अंगणवाडी क्रमांक  ( ७ ) सात मधील एल ई डी अज्ञात व्यक्तीने खिडकीतुन दगड मारुन फोडला आहे. सदरिल एल ई डी  हरंगुळ (बु) गावचे सुपुत्र व सातारा जिल्हा मधील जावळी पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी पदावर सेवेत असलेले सतिष राजकुमार बुध्दे  यानी भेट दिला होता. साधारणता एक वषाऀपुर्वी भेट दिलेला पंचेविस ते तिस हजार रुपय किंमतीचा एल ई डी उदघाटन होण्यापुर्वीच उध्दवस्त झाला. अंगणवाडीला विद्युत पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतने वेळेवर डिमांड न भरणे आणी उशीरका होईना पण डिमांड भरुन झाले नंतर आता तिन ते चार महिने झाले ग्रामपंचायत मध्ये विद्दुत मिटर  येवुन पडले आहेत. मात्र ग्रामपंचायत च्या गलथानपणामुळे अजुनही अंगणवाडीत विद्दुत मिटर बसले नाहीत. मिटर बसले नसले तरी मागील महिण्याचे बील मात्र आले असल्याचे अंगणवाडी कार्यकृती इंदुमती नरहारे ऊर्फ गुरमे यानी सांगितले. शाळेच्या समोर कुलुपबंद गेट असले तरी मागील बाजुचे कंपाउंड वॉल पडलेले असल्याने सहजपणे कोणालाही आत येता येते. तेथुनच आत येवुन दरवाजाच्या वर असलेल्या लेंटल स्लॕबवर चढुन गोल खिडकीची पत्रीजाळी बाजुला सारुन आत एल ई डी च्या दिशेने  चार ते पाच दगड मारलेचे दिसत आहे.
काल दिनांक ०६/०३/२०२० रोजी अंगणवाडी कार्यक्रती इंदुमती नरहारे या अंगणवाडीकडे पहाणी करणेसाठी गेले असता सदरचा प्रकार उघडकीस आला. नरहारे यांनी मंदार येथील कांही नागरीक व हरंगुळ चे माजी सरपंच व्यंकट पनाळे याना बोलावुन सदरिल बाब निदर्शणास आणुन दिली.
शाळेच्या विकासासाठी लक्ष देणेस शालेय समितीला वेळच नाही. शालेय समितीच नियमबाह्य बनवली असुन हौसे नवसे मंडळी या शालेय समितीत पंचायतने भरती केली आहेत. अज्ञात लोक याचाच गैरफायदा घेवुन शाळेचे नुकसान करित आहेत. अनेक मद्यपी शाळेत दारु पिवुन रिकाम्या बाटल्या मैदानात व कपाउंड वॉल जवळ टाकुन जातात.