नम्रता सावळे यांच्या "आर्जव" या काव्यसंग्रहाचे सुनंदावहिनी पवार यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

नम्रता सावळे यांच्या "आर्जव" या काव्यसंग्रहाचे सुनंदावहिनी पवार यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न


लातूर / प्रतिनीधी


 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आमदार रोहितदादा पवार यांच्या मातोश्री गोरगरिबांची आई, एक कर्तत्ववाण आणि क्रांतिकारी महिला सौ.सुनंदावहिनी पवार व बारामतीच्या नगराध्यक्षा सौ पोर्णिमाताई तावरे यांच्या शुभहस्ते कवयित्री सौ.नम्रता जगदीश सावळे यांच्या "आर्जव" या काव्यसंग्रहाचे  प्रकाशन बारामती येथील आपासाहेब पवार सभागृहात हजारो लोकांच्या उपस्तिथीत संपन्न झाला. या वेळी व्यासपीठावर सौ.नागिनबाई पटणे, सौ 
.सरोजिनी सावळे, सौ.संगीता पटणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
                 या काव्यसंग्रहामध्ये  स्त्रियांच्या जीवनाशी संबंधित एकूण 48 कविता आहेत,या सर्व कविता वेगवेगळा विषय हाताळतात, अनेक महिला जीवनाचा प्रवास या कविता उलगडून दाखवतात. जीवन जगत असताना प्रत्येक स्त्रीला ननंद, भावजय, बहीण, मैत्रीण, बायको, सून, सासू अशा अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात; या भूमिका साकारताना, विविध नाती जपताना स्त्रीने कसा विचार करायला हवे हे सांगण्याचा प्रयत्न सौ.नम्रता सावळे यांनी कवितांच्या माध्यमातून केला आहे त्याचबरोबर जीवनातील अनेक समस्यांना सामोरे जाताना खचुन न जाता बिनधास्तपणे जगण्याचा संदेशही सौ.नम्रता सावळे यानी कवितांतून दिला आहे.
 पुस्तक प्रकाशनाच्या वेळी सौ सुनंदा वहिनी पवार यांनी नम्रता सावळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच आजची स्त्री केवळ चूल आणि मूल  त्यांचा सांभाळ करत असतानाच ती स्वतंत्र विचारांची, आपले विचार मांडण्यास समर्थ बनलेली असावी, ती स्वतःच्या पायावर उभी असावी इतरांवर अवलंबून असू नये तरच आजची स्त्री खर्‍या अर्थाने उत्तम जीवन जगण्यात समर्थ बनू शकेल असा मौलिक सल्ला  सौ.सुनंदा वहिनी पवार यांनी उपस्थित  महिलांना दिला.