इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
उदगीर / प्रतिनिधी
उदगीर येथील सुप्रसिद्ध अशा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध उद्योजक तथा माजी नगरसेवक मा.राहुलभैय्या आंबेसंगे तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.महेश शर्मा, महाराष्ट्र बसव परिषदेचे जिल्हा अध्यक्ष मा.कुणाल बागबंदे, पोलीस उपनिरीक्षक मा.गजानन पाटील, युवा उद्योजक मा.राहुल पाटील मलकापूरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लासेसचे संचालक प्रा.सिध्देश्वर पटणे यांनी करून उपस्थित मान्यवरांना क्लासेसच्या चढत्या आलेखाची माहिती दिली. या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थांना त्यांच्या भावी उज्वल आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर राहुलभैय्या आंबेसंगे यांनी सकाळी घरातून बाहेर पडताना आई- वडिलांचे चरण स्पर्श करून, त्यांचा आशीर्वाद घेऊनच घराबाहेर पडा, प्रामाणिक कष्ट करा म्हणजे जीवनात आपल्याला कधीच कुठे कांही कमी पडणार नाही असा मौलिक सल्ला आपल्या अध्यक्षीय समारोपात दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजय जामकर तर आभार प्रदर्शन प्रा.सोमनाथ बिराजदार यांनी केले.