<no title>रोकडोबा महाराज  तीर्थक्षेत्र परचंडा येथे जिप  अध्यक्ष राहुल केंद्रे यांची भेट  तीर्थक्षेत्र ब दर्जा मिळवून देणार राहुल  केंद्रे

रोकडोबा महाराज  तीर्थक्षेत्र परचंडा येथे जिप  अध्यक्ष राहुल केंद्रे यांची भेट
 तीर्थक्षेत्र ब दर्जा मिळवून देणार राहुल  केंद्रे



  अहमदपूर उदगीर 


 
 लातूर जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा राज्यातील जनतेचे श्रद्धास्थानअहमदपुर तालुक्यातील  प्रचंडा येथील तीर्थक्षेत्र जाज्वल्य हनुमान श्री रोकडोबा महाराजमंदिरास  तीर्थस्थळास  भारतीय जनता पार्टीचे युवानेते लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल भैया केंद्रे व उपसभापती सज्जन लोनाळे यांनी भेट देऊन रोकडोबा हनुमानाचे विधीवत दर्शन घेतले
 यावेळी त्यांचा शानदार सत्कार देवस्थान कमिटीच्या वतीने कापसे मन्मथ  भानुदास कांबळवाड संगम कापसे वसंत जाधव भारत शेळके  आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले
 यावेळी भाजपाचे माजी अध्यक्ष हनुमंतराव  हंडरगुळे सह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला तद नंतर अध्यक्ष केंद्रे व मान्यवरांनी महाप्रसाद घेतला याच वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचाही सत्कार पञकिर महेश मठपती व इतरांनी केला 
 सत्कार प्रसंगी  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांनी नागरिकांशी बोलताना सांगितले की  परचंडा येथील तीर्थक्षेत्र ब दर्जा मिळवून देणार तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून मंदिर व परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे बोलत ग्रामस्थांनी राहुल भैया यांच्यासमोर भाविकांच्या आरोग्याचे दक्ष ते साठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सब सेंटर परचंडा येथे मंजूर करावे अशी मागणी केली तेव्हा अध्यक्ष केंद्रे यांनी सांगितले या तीर्थक्षेत्राच्या विकासाबरोबर परचंडा नगरीचे विकासासाठी जे काही करता येईल त्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार असून या मंदिरास भविष्यात ब दर्जा  मिळवुन देण्यासाठी  प्रयत्न  करणार असेही  सांगितले