"विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि दूरदर्शन व मोबाईल"
उदगीर / प्रतिनीधी
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे सर्वेच्च ध्येय आहे. ते ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी निव्वळ शिक्षणाच्या अध्यापन द्वारे शिकतो असे नाही तर त्यांच्या अध्ययनावर कुटुंबातील वातावरण व शाळेतील अध्यापन यांचा इष्ट अनिष्ट परिणाम होत असतो.
प्रभावी अध्यापनासाठी प्रभाव अध्ययन वातावरणाची गरज असते. यासाठी अनेक अध्यापनाच्या पद्धती उदयास आल्या आहेत. त्यामध्ये अनेक शैक्षणिक साधनांची भर पडली आहे. यात दूरदर्शन व मोबाइल अत्यंत प्रभावी अध्ययावत विद्यार्थ्यांना आकर्षण घेणारे संपूर्ण विश्वातील ज्ञान घरा पर्यंत दाखवण्याचे साधन आहे. ते कोणासी मान्य करावे लागेल. ते मान्य केल्या नंतर दूरदर्शन ला व मोबाइलला नाकारण्याचे कारण नाही, परंतु आज दूरदर्शनच्या अध्यापणावर होणारा परिणाम पाहिला तर दूरदर्शन च्या माध्यमातून होणारे संस्कार अतिशय धोकादायक व कुसंस्कार करणारे आहेत हे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासावर दूरदर्शन व त्या मोबाइलचा अत्यंत वाईट परिणाम झालेला आहे. तर संशोधनाने दिसून आलेले आहे. शारीरिक विकास योग्य प्रकारे नाही झाला तर प्रभावी अध्ययन होऊ शकत नाही. त्या प्रमाणे त्याचा मानसिक विकासी विकृत होत चाललेला दिसून येत आहे.
दररोज खून, चोरी, दरोडे, बॉम्ब स्फोट असे हिंसात्मक घटना पहिला मिळत असल्यामुळे या सर्व बाबी विद्यार्थ्यांला स्वाभाविक वाटत आहेत, कुणी जखमी झाला किंवा मृत्यू पावला तरी त्यांना विशेष वाटत नाही असे दिसून येत आहे.
परिणामी विद्यार्थ्यांना भावनिक स्तरावर एकत्रित आणणे त्याची वास्तल्याची भावना वाढवून संपूर्ण देशाबद्दल ची देशभक्तीची व समाज सेवेची भावना निर्माण करणे अवघड होत आहे.
विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तरावर विचार केला तर विद्यार्थी चिंतन शील राहिलेला नाही. अध्ययनासाठी आवश्यक असलेल्या पाठ्यपुस्तकाचे आवांतर वाचन तो करत नाही. वाचन क्षमता व समजावून घेण्याची पद्धत राहिलेली नाही व त्यात त्याला रसही वाटत नसल्यामुळे उलट तो नवनीत चा उपयोग करून तो निव्वळ ज्ञान पातळीवर स्मरणशक्ती च्या आधारे किंवा कॉफीच्या आधारे निव्वळ पास होणे इतकेच उद्दिष्ट आजच्या विद्यार्थ्या पुढे, शिक्षकापुढे, पालकापुढे अमर्यादित झाले आहे. सारांश आपण सर्वांना या दूरदर्शनच्या व मोबाईलच्या दुष्टपरिणामांचा विचार करणे भाग आहे. कारण सध्या वेळेचाच विचार केला तर आपल्या लक्षात येईल की विद्यार्थी दररोज तीन तास मोबाइल व दूरदर्शन पाहतात. सोमवार ते गुरुवार रोज दोन ते तीन मालिका गृहीत धरल्या तर एकूण बारा तास जातात शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसाचे तीन चित्रपट धरले तर नऊ तास जातात. तसेच शनिवार व रविवारी असलेल्या इतर मालिकांचा हिशोब केला तर आणखी सहा तास आयुष्यातील सहज जातात. हा वेळ किती ही रक्कम दिली तरी ती भरून निघणार नाही. म्हणून पालकांना कळकळीची व आग्रहाची विन्नती आहे की. या दूरदर्शनचा व मोबाईल चा खराब प्रभाव अभ्यास करून आपण आपल्या पाल्यांना मर्यादित दूरदर्शन व मोबाइल पाहण्याचे बंधन करावे किंवा त्यांना प्रोत्साहन द्यावे व वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांना चांगली पुस्तके वाचन्यास प्रवृत्त करावे. वाचना मुळे खूप मोठ्या पदावर यशाचे शिखर गाठू शकतो. यशाचे शिखर गाठून आपल्या आई - वडिलांचे, शाळेचे, समाजाचे, देशाचे नाव मोठे करू शकतो. यात शंका नाही.
सुवर्णकार बालाजी नारायण (तोंडारकर)
सहशिक्षक
श्री विश्वनाथराव प्राथमिक विद्यालय देगलूर रोड उदगीर. ता. उदगीर जि. लातूर