लातूर शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद राहतील.

लातूर शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद राहतील.


लातूर / प्रतिनिधी 



लातूर शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लास, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, चित्रपट गृह, मॉल* उद्या पासून ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याबाबत राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा प्रशासनाने सूचित केलेले आहे.
आज जरी लातूर मध्ये करोना चे कोणतेही रुग्ण नसले तरी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. 
या अनुषंगाने पालकांनी विद्यालय प्रशासनास सहकार्य करावे तसेच शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांनी बाहेर गावी जाणे टाळावे व नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे हि विनंती.
विक्रांत गोजमगुंडे, महापौर
लातूर शहर महानगरपालिका, लातूर