उदगीर ग्रामीण भागात जूगार मटक्याचा हेदोस !  पोलीस मालामाल, जनता कंगाल !

उदगीर ग्रामीण भागात जूगार मटक्याचा हेदोस!!!



 पोलीस मालामाल, जनता कंगाल!!!


 उदगीर / प्रतिनिधी


उदगीर तालुक्यात सध्या जुगार ,मटका, गुटका मोठ्या तेजीत चालू असून या सर्व अवैध धंद्याला पोलीस प्रशासनाचे अभय असल्याची चर्चा चौकाचौकात चालू आहे. यामुळेच भर रस्त्यावर चौकाचौकातून मटक्याचे आणि गुटक्याचे दुकान थाटले गेले आहेत. हे सर्व तात्काळ बंद व्हावेत. यासाठी वेळोवेळी अनेक संघटनांनी निवेदने देऊन निदर्शने करून या प्रकरणाला आळा घालावा. म्हणून मागणी केली. मात्र जनतेच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावत, मागणीचे निवेदनाला केराच्या टोपलीत टाकण्यात आल्याची खंत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. उदगीर शहर आणि तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावा यादृष्टीने कोणतेही ठोस निर्णय घेतले जात नसल्याने अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदगीर शहरात अवैद्य धंद्याची पाळेमुळे सर्व ताकतीने शिरली जात आहेत. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. असेही लोक बोलत आहेत. उदगीर शहरात आणि ग्रामीण भागात त्रिमूर्ती च्या संगमातून अवैद्य धंद्याला चालना मिळत असून यांच्या पुढाकारामुळे पोलीस प्रशासन देखील गप्पगार बसले आहे. किंवा त्यांना पेल्यात उतरवले गेले आहे .यासंदर्भात उलट-सुलट चर्चा चालू आहे. उदगीर ग्रामीण भागात प्रत्येक मोठ्या गावातून सर्रासपणे मटक्याच्या बुक्या चालू आहेत. गुटका देखील दिवसाढवळ्या चौकात चौकातील पानटपऱ्या वर उपलब्ध होत आहे. एका बाजूला गुटखाबंदीचा नारा वाजवत पोलीस प्रशासन मिरवत असले तरी, कर्नाटकातून पोलिसांच्या आशीर्वादाने उदगीर शहरात मटका,गुटका येत असल्याचे बोलले जात आहे. प्रसिद्धीमाध्यमांनी ओरड केल्यानंतर एखाद-दुसऱ्या छोट्या टपरीवर धाड टाकून आम्ही गुटखा पकडला. अशी चमकोगिरी काही पोलिस अधिकारी करत आहेत. तसेच मटक्याच्या ही बाबतीमध्ये छोटे बुक्की धारक आहेत त्यांच्यावर धाडी टाकून आम्ही मटका चालकांना पकडल्याच्या बतावण्या केल्या जात आहेत. मात्र मटका चालक आबादीआबाद आहेत. मुळावर घाव घालण्याची ताकद पोलीस प्रशासनामध्ये का नाही ?असाही प्रश्न जनतेतून विचारला जातो आहे. तसेच सर्व प्रकारच्या अवैद्य धंद्याला पाबंद करावा. अशी आग्रही मागणीही केली जाते आहे. लोकरेट्याला पोलीस प्रशासन कितपत साथ देईल ?याकडे आता जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.


Popular posts
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image
प्रभाग क्र . 20 मधून राजू भोसले यांनी काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज मतदारांमध्ये जोरदार चर्चा
उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू — महायुतीमध्ये उमेदवारीवरून नाराजगी सूर
Image
तोगरी पंचायत समितीसाठी अंकुश ताटपल्ले पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
Image
तिवटग्याळ ग्रामविकासात सरपंच प्रशांत पाटील यांचे उल्लेखनीय योगदान – ‘आदर्श सरपंच’ पुरस्कारासाठी योग्य दावेदार
Image