शैक्षणिक संस्थांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी डॉक्टर अंजुम कादरी
उदगीर / प्रतिनिधी
उदगीर प्रत्येक शैक्षणिक संस्थेने जर सामाजिक बांधिलकी जोपासली आणि गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवले तर शिक्षणाच्या प्रवाहामध्ये गोरगरिबांची मुले मोठ्या वेगाने सहभागी होतील याच दृष्टीने जम्मू हुर विद्यालय व ज्युनियर कॉलेज हे सतत वेगवेगळे उपक्रम राबवत आहे त्याचाच निष्कर्ष म्हणून आज समाजामध्ये स्पर्धा परीक्षेचे गरीब विद्यार्थ्यांसाठी चे मोफत वर्ग घेणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था ठरली आहे असे विचार संस्थेचे सचिव डॉक्टर अंजुम फातेमा बेगम कादरी यांनी व्यक्त केले त्या जम्मू हुर विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या विद्यालयाचे प्राचार्य राजा पटेल अब्दुल बाकी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्यामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एल पी उगीले हे होते याप्रसंगी व्यासपीठावर या विद्यालयाचे पर्यवेक्षक फारुकी अब्दुल वाहन तसेच गोलंदाज वाजिद शेख शहीद सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना डॉक्टर अंजुम कादरी म्हणाले की आमच्या संस्थेकडून गरजू आणि गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षांचे वर्ग चालवले जातात ज्या वर्गासाठी लाख लाख दोन लाख शुल्क आकारले जाते अशाच मोठ्या महाविद्यालयाचे प्राध्यापक आमच्याकडे येऊन गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देत आहेत हाच आदर्श शैक्षणिक संस्थांनी जपला पाहिजे आपण विद्यार्थी केंद्रित आहोत आपले अस्तित्व विद्यार्थ्यासाठी आहे याची जाणीव संस्थाचालकांनी ठेवली पाहिजे असे विचार त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले यात कार्यक्रमात बोलताना प्राचार्य एल पी उगिले यांनी स्पष्ट केले की विद्यार्थ्यांनी मोठमोठी स्वप्नं पाहावीत पण झोपेत दिसणारी स्वप्न पाहता जी स्वप्न झोपत येऊ देत नाहीत अशी ध्येयापर्यंत घेऊन जाणारी स्वप्न पहावी विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही हे करू शकतो हा आत्मविश्वास मनामध्ये कायम ठेवून अभ्यास केल्यास 100% त्यांना प्राप्त होऊ शकते असे सांगितले अध्यक्षीय समारोपात प्राचार्य राजा पटेल अब्दुल बाकी यांनी स्पष्ट केले की आमच्या विद्यालयातील विद्यार्थिनींना सर्वगुणसंपन्न बनवण्यासाठी आम्ही वर्षभर प्रयत्न केले आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे विद्यार्थी आमचे नाव उज्वल करतील आजपर्यंतच्या इतिहासात आमच्या विद्यालयाने एक वेगळा गौरवशाली इतिहास ठेवला आहे त्या इतिहासाची पुनरावृत्ती करत किंबहूना त्याहीपेक्षा उज्वल निकाल देत आमचे हे विद्यार्थी यशस्वी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमासाठी विद्यार्थी-पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते