किल्लारी पोलीसांनी बैल चोरास पकडले
औसा / प्रतिनिधीत्
हसलगण ता.औसा येथील बाबु कोराळे यांचे शेतातुन देवणी जातीचे दोन बैल चोरी गेलेवरुन किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता
सदर गुन्हाचा तपास मा.उपविभागीय पोलीस अधिकारी औसा श्री.राजीव नवले, किल्लारी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री.विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक स्थापन करुन सदर गुन्हाचा तपास करुन पथकाने गुन्हा उघडकीस आणला, यात आरोपी नामे शिवाजी बालाजी कुमदाळे रा.कुमठा ता.उदगीर ,बालाजी गोविंद कदम रा.हसलगण व मालन खंडु गवळी रा.हसलगण ता.औसा यांना अटक करुन विचारपुस केली असता, सदर आरोपीतांनी चोरुन नेलेले बैल लोहा जि.नांदेड येथील व्यापार्यास विकल्याचे सांगीतले , सदर तपासात किल्लारी पोलीसांच्या पथकाने ५५ हजार रोख रक्कमेसह एक पिक अप वाहन असा 2,80000 हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.
सदरची कारवाई पो.उप निरीक्षक अमोल गुंडे, पोहेका गणेश यादव, पोहेका उमाकांत चपटे, पोका आबासाहेब इंगळे यांच्या पथकाने अथक परीश्रम करुन पार पाडली.