प्राचार्य व्ही. एस.कणसे यांना नागपूरचा राष्ट्रीय  रत्न  ऑवार्ड प्रदान 

प्राचार्य व्ही. एस.कणसे यांना नागपूरचा राष्ट्रीय  रत्न  ऑवार्ड प्रदान 



उदगीर/प्रतिनिधी :  


येथील विद्यावर्धिनी  इंग्लीश स्कुलचे प्राचार्य व्ही. एस.कणसे यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल कलाजीवन मल्टीपर्पज सोसायटी नागपूरच्या वतीने राष्ट्रीय रत्न ॲवार्ड 2020प्रदान करण्यात आला आहे . रिगंरोड चौक,अध्यापक नगर,महाले सभागृह नागपूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते तो त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी गांधी फाउंडेशन नेपाळ चे अध्यक्ष डाॅ.लाल बहादूर राणा, पदमश्री  डाॅ.विकास महात्मा, आंतरराष्ट्रीय मिस इंडिया 2019 रूचिका घोडमारे,   मीस इंडिया 2017 सौम्या मंगलानी, कलाजीवन मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष युवराज ठाकरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
     प्राचार्य व्ही. एस.कणसे यांना यापूर्वी 2004 चा बेस्ट रिचर्स अॅवार्ड, उपकमशिल मुख्याध्यापक म्हणून अनेक संस्थानी सन्मानीत केले.2010 चा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार, पं.स.उदगीरचा 2019 चा उत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्कार, कै.विलास भोसले मित्रमंडळ 2012 चा आदर्श शिक्षक पुरस्कार. एच.एफ.संस्था नवी दिल्लीचा 2015 चा नॅशनल अॅवार्ड नवी दिल्लीचा 2016 चा राष्ट्रीय शैक्षणिक अॅवार्ड, काव्यमित्र संस्था पुणेचा 2016 चा म.फुले राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार असे अनेक पुरस्कार यांना प्राप्त झाले आहेत. 
    प्राचार्य व्ही. एस.कणसे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार पाटील (शिरोळकर), सचिव ज्ञानदेव झोडगे,  मुख्याध्यापक एस.एन.घोडके, उपमुख्याध्यापक अविनाश पोशट्टी, पर्यवेक्षक व्ही. एम.भांगे, माजी मुख्याध्यापक उब्ल्यू. डी.पांचाळ व मित्रपरिवारानी अभिनंदन केले आहे.