शिवचरित्रात व्यक्तिमत्व घडते.... सौ उज्वला जाधव

शिवचरित्रात व्यक्तिमत्व घडते.... सौ उज्वला जाधव


उदगीर / प्रतिनिधी


 


 उदगीर तालुक्यातील मौजे शेकापुर येथील सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून ग्रामसेवक सौ. उज्वला जाधव या उपस्थित होत्या. व्यासपीठावर या वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव फुलारी_ भालके, माजी तंटामुक्ती अध्यक्ष व्यंकटराव पाटील, काशिनाथ सावंत ,अशोक पिंपळे, गोपीनाथ हलकारे, राम जाधव, गोविंद शेल्हाळे,  खंडेराव जाधव, इब्राहिम मुंजेवार, ग्रंथालय चळवळीचे नेते रामेश्वर बिरादार नागराळकर, यशवंतराव कुलकर्णी, दयानंद पाटील मलकापूर यांच्यासह मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. पुढे बोलताना जाधव म्हणाल्या की, सध्याच्या घाई गर्दीच्या आणि ताण-तणावाच्या काळात शिवाजी महाराजांचे विचार राष्ट्रनिर्मितीसाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी अत्यंत गरजेचे असून महाराजांच्या विचारांचा सन्मान आणि प्रत्यक्ष जीवनात अवलंब केल्यास निश्चितच राष्ट्र निर्मितीचे कार्य होऊ शकेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन निलेश भालके यांनी केले.