महाविद्यालयीन जीवनामध्ये आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवा
जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भैया केंद्रे
जळकोट प्रतिनिधी
जळकोट येथील संभाजी राव केंद्रे महाविद्यालयातर्फे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी राहुल भैया केंद्रे बोलत होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून वि वा शिरवाडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
महाविद्यालयीन जीवनामध्ये करिअरला दिशा देण्यासाठी योग्य वेळ असून या काळामध्ये तुमच्या आयुष्याची पुढची भावी दिशा ठरत असते ,त्यामुळे तुम्ही सर्वांनी ठरवायचं आहे की आपल्याला मोठ्या पदांवर जायच आहे स्पर्धात्मक परीक्षा देऊन यश संपादन करायचे आहे.
आज जागतिकीकरणामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत .
स्वतःमध्ये विशेष कौशल्य असल्यास आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करू शकतो राजकारण असेल, संगीत ,सीए ,स्पर्धात्मक परीक्षा याच्यामधून तहसीलदार, उपजिल्हाधिकारी ,पोलिस उपअधीक्षक आदी पदांवर आपण पोहोचू शकतो.
विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन यावेळी राहुल भैय्या केंद्रे यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भागवत केंद्रे हे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य बी.टी. लहाने सर ,भाजपाचे तालुकाध्यक्ष अरविंद पाटील नागरगोजे परभणीचे डॉ.विठ्ठल घुले, सत्यवान पांडे, भाऊराव कांबळे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते