ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत स्नेहसंमेलने ही झालीच पाहिजेत
जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे
देवणी / प्रतिनिधी
जि.प. प्रा.शा गुरनाळ तालुका देवणी येथील शाळेत पहिल्यांदाच स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल भैय्या केंद्रे हे बोलत होते
या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश कुसनुरे अध्यक्षस्थानी होते या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सभापती चित्रकला बिरादार ,पंचायत समिती सदस्य सोमनाथ बोरोळे, डॉ. अनिल इंगोले देवणी चे गटशिक्षणाधिकारी उज्वल कुमार कुलकर्णी. गुरनाळचे सरपंच फतरोद्दीन बालकुंदे , गुरनाळ चे मुख्याध्यापक मिर्झा एम डब्ल्यू यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी व पालक उपस्थित होते
यावेळी पुढे बोलताना राहुल केंद्रे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये कलागुण खूप असतात त्यांना वाव देण्यासाठी ग्रामीण भागामध्ये सुद्धा स्नेहसंमेलनाचे आयोजन हे झालेच पाहिजे आणि याकरिता जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांच्या पाठीशी ठाम उभा असून त्यांनी स्नेहसंमेलने आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा .तसेच शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत व जिल्हा परिषदेची विद्यार्थीही भविष्यामध्ये यश मिळवू शकतात हे दाखवून देण्यासाठी काम करावे.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ यांचे कौतुक मा. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल भैय्या केंद्रे यांनी केले.