महाकवी चंदबरदाई सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका चे उद्घाटन तीवेटग्याळ येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते पार पडले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राहुल केंद्रे म्हणाले ग्रामीण भागामध्ये शिक्षण व्यवस्थेचा आजही अभाव आहे समाजामध्ये कित्येक विद्यार्थी गुणवान आहेत पण त्यांना पाहिजे तशी व्यवस्था परिस्थितीमुळे उपलब्ध होऊ शकत नाही पण या अभ्यासिका यामुळे गुणवान विद्यार्थ्यांसाठी यशाचे ज्ञानमंदिर निर्माण होणार आहे खरे तर नेहमी आम्ही सार्वजनिक विकास करत असताना प्रत्येक गावातील सरपंच असो की राजकीय सामाजिक कार्यकर्ता असो यांनी शिक्षण व्यवस्था कडे लक्ष दिले पाहिजे प्रत्येक गावामध्ये अभ्यासिका निर्माण झाल्या तर गुणवान विद्यार्थ्यांना या अभ्यासिकाच्या माध्यमातून खूप मोठा आधार मिळू शकतो आसे मत वेक्त केले यावेळी गावचे सरपंच प्रशांत पाटील रमेश साळुंखे भास्कर पाटील देविदास पाटील बालाजी पाटील दिनेश पाटील दिनेश पवार ज्ञानेश्वर पवार बालाजीराव गवारे विजयकुमार पाटील कैलास पाटील जयसिंग पाटील कोरे आप्पा नरारे कारभारी निलेश पेठे गावातील नागरिक उपस्थित होते
अभ्यासिका बनतील गुणवान विद्यार्थ्यांच्या यशाचे ज्ञानमंदिर -राहुल केंद्रे