पोलिसांच्या आशिर्वादाने ग्रामीण भागात बेकायदेशीर दारू विक्री

 पोलिसांच्या आशिर्वादाने ग्रामीण भागात बेकायदेशीर दारू विक्री

उदगीर/प्रतिनीधी


उदगीर ग्रामीण पोलिस हद्दीत सध्या मोठ्याप्रमाणात अवैध दारू विक्री होत असुन काही ठिकाणी तर या दारू विक्रीला पोलिसांचे अभय मिळत आहे. तोडार, कुमठा, लोणी व सोमनाथपुर या भागात खुलेआम बेकायदेशीर दारू विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे या भागातील नविन आलेल्या प्रशासनाला केराची टोपली दाखवनारे बिट आमंलदा व दारू विक्रते यांच्यात साटगाठ असल्याचे ग्रामीण भागातील महिला व सुजाण नागरिक बोलत आहेत.

 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने बार, उपहारगृह व दारू दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व दारू दुकाने बंद असली तरी मोठ्याप्रमाणात सर्वप्रकारची दारू चड्या भावाने मिळत आहे. उदगीर ग्रामीण पोलिस हद्दीत सध्या मोठ्याप्रमाणात दारूचा सुळसुळाट आहे. ग्रामीण भागात पोलिस कर्मचारी, शिक्षक व शासकीय कर्मचारी ओलीपार्टी करीत असल्याचे व्हिडीओ समोर येत आहेत. या अवैध दारू विक्रीला आवर कोण घालणार, बेकायदेशीर खुले आम होत असलेल्या दारू मुळे ग्रामीण भागात कोरोनाचा मोठ्याप्रमाणात फैलाव होत आहे.

      गेल्या दोन- तीन वर्षांपासून दारूबंदी कार्यालय असुन नसल्यासारखे बनले आहे. या कार्यालयातील कर्मचारी महिनेवारी हाप्ते गोळा करण्यासाठी बाहेर निघतात. बाकिच्या वेळस अवैद दारूविक्रीला प्रोत्साहन देतात की काय ? या कार्यालयास व कर्मच्याऱ्यांवर नरज ठेवणारे कोणच नसल्यामुळे यांचा मनमाणी कारभार सुरु आहे. तर दुसरीकडे पोलिस कर्मचारी अवैध धंद्यांर कार्यवाही करीत नसल्याचे दिसुन येत आहे. कोरोनाची जागतीक महामारी दिवसेंदिवस वाढत चालली असताना पोलिस कर्मचारीच ओलीपार्टी करण्यात व्यस्त आहेत. शिवय बिट जमादार छुप्या पध्दतीने दारू अवैध दारू विक्रीला मदत करीत असल्याचे अनेक गावाती नागरिक व्यक्त करीत आहेत.